शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये भाजपाचा "चाबूक "मोर्चा; राज्य शासनाच्या विरोधात संतापाची भावना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 14:47 IST

Kalyan BJP News : कल्याणच्या तहसील कार्यालयावर भाजपच्या भटके विमुक्त आघाडीतर्फे 'चाबूक मोर्चा' काढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

कल्याण - भटक्या विमुक्तांना नोकरीत पदोन्नती देता येणार नाही असे प्रतिज्ञापत्र राज्यशासनाने सर्वोच्च  न्यायालयात सादर केल्याने राज्यातील हजारो भटक्या समाजातील कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये राज्य शासनाच्या विरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे. हे अन्यायकारक प्रतिज्ञापत्र मागे घेण्यासाठी कल्याणात भाजपतर्फे आज जोरदार आंदोलन करण्यात आले. कल्याणच्या तहसील कार्यालयावर भाजपच्या भटके विमुक्त आघाडीतर्फे 'चाबूक मोर्चा' काढून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.  या 'चाबूक मोर्चा'मध्ये सहभागी झालेल्या पोतराज अर्थातच कडकलक्ष्मीकडून आसूड ओढत सरकारचा निषेध करण्यात आला. 

राज्य सरकारने गेल्या महिन्यात भटके विमुक्त जमातीच्या शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्यामध्ये भटक्या विमुक्त जाती जमातींना आरक्षण देणे असंविधानिक असल्याचे राज्य शासनाने नमूद केल्याचे भाजपतर्फे तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एकीकडे राज्य सरकारकडून वर्षानुवर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मतं मागितली आणि त्याच समाजाला वंचित करण्याचे काम सरकारने सुरू केलं आहे.

राज्य सरकारच्या या प्रतिज्ञापत्रामुळे भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये संतापाची लाट पसरली असून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आज हे आंदोलन करण्यात आलं असं भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितलं. भटके विमुक्त जाती जमाती समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेऊन त्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या मोर्चामध्ये भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजपच्या भटके विमुक्त आघाडीचे कल्याण जिल्हाध्यक्ष विष्णू सांगळे व इतर भाजप पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :kalyanकल्याणBJPभाजपा