देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष माहीत नसल्याची खंत; भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 14:11 IST2021-08-28T14:08:30+5:302021-08-28T14:11:30+5:30
BJP News : दोन हजार पत्र वर्षावर पाठवण्याचे नियोजन शनिवारी करण्यात आले.

देशाच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष माहीत नसल्याची खंत; भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांना ७५ हजार पत्र पाठवणार
डोंबिवली - 'आमचा देश हा आमच्या अस्मितेचा विषय आहे आणि देशाच्या स्वातंत्र्याचे कितवे वर्ष हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती नसणे हे राज्याचे दुर्दैव आहे. देशाचा अभिमान असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला हिरक महोत्सव म्हणून संबोधणे मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही' अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरातून पाठवले जाणार असल्याची जाहीर माहिती भाजपचे कल्याण युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी सांगितले. येथूनही दोन हजार पत्र वर्षावर पाठवण्याचे नियोजन शनिवारी करण्यात आले.
भाजपच्या युवा मोर्चा महाराष्ट्र, परदेशातून ७५००० पत्र पाठवण्याचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. त्याचा शुभारंभ शनिवारी डोंबिवलीत एमआयडीसी पोस्ट ऑफिस येथे प्रातिनिधिक स्वरूपात पत्र पाठवून करण्यात आला. त्यावेळी वेळी भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अथर्व ताडफळे, जिल्हा सचिव चिंतन देढिया, ग्रामीण मंडल सरचिटणीस चैतन्य काळण, रतन पुजारी, गांधार कुलकर्णी, संदीप शर्मा, अपूर्व कदम आदी जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.