मातोश्रीबाहेरील आंदोलनात कल्याणचा भाजपचा पदाधिकारी सहभागी, ठाकरे गटाचा आरोप

By मुरलीधर भवार | Updated: July 30, 2024 18:18 IST2024-07-30T18:17:51+5:302024-07-30T18:18:21+5:30

Shiv Sena UBT alleges BJP: आज मराठा समाजाच्या वतीने मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आले .आंदोलकांनी उद्धव ठाकरेशी भेटण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समनव्यक हर्षवर्धन पालांडे यांनी या आंदोलनात कल्याणचे भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ हा सहभागी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

BJP office bearer of Kalyan participated in protest outside Matoshree, Thackeray group alleges | मातोश्रीबाहेरील आंदोलनात कल्याणचा भाजपचा पदाधिकारी सहभागी, ठाकरे गटाचा आरोप

मातोश्रीबाहेरील आंदोलनात कल्याणचा भाजपचा पदाधिकारी सहभागी, ठाकरे गटाचा आरोप

- मुरलीधर भवार 

कल्याण -आज मराठा समाजाच्या वतीने मातोश्री बाहेर आंदोलन करण्यात आले .आंदोलकांनी उद्धव ठाकरेशी भेटण्याची मागणी केली. ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा समनव्यक हर्षवर्धन पालांडे यांनी या आंदोलनात कल्याणचे भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ हा सहभागी झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
कल्याण पश्चिमेकडील मोहने परिसरातील राहणारा भाजपचा पदाधिकारी पायाळ हाआंदोलनात झाला होता. हा पदाधिकारी मराठा समाजाचा देखील नाही. तरी तो आंदोलनात सहभागी झाला. मातोश्रीला बदनाम करण्याचे काम भाजप करीत आहे. मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठीचे आंदोलन सुरळीत चालू आहे. त्याला गालबोट लावण्याचे काम भाजप करत आहे हे पाप भाजपला विधानसभा निवडणुकीत फेडावे लागेल अशी टिका पालांडे यांनी केली आहे.

Web Title: BJP office bearer of Kalyan participated in protest outside Matoshree, Thackeray group alleges