गुटखा दिला नसल्याच्या रागातून मारहाण

By सदानंद नाईक | Published: June 24, 2024 06:59 PM2024-06-24T18:59:00+5:302024-06-24T19:00:10+5:30

उल्हासनगर : छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहा पिण्यासाठी गेलेल्या अनिल कोसी यांच्याकडे रवी याने गुटखा मागितला. गुटखा न दिल्याच्या ...

Beating out of anger for not giving Gutkha | गुटखा दिला नसल्याच्या रागातून मारहाण

गुटखा दिला नसल्याच्या रागातून मारहाण

उल्हासनगर : छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहा पिण्यासाठी गेलेल्या अनिल कोसी यांच्याकडे रवी याने गुटखा मागितला. गुटखा न दिल्याच्या रागातून अवीसह ८ जणांच्या टोळक्याने, कोसी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 उल्हासनगर खेती एरिया परिसरात राहणारे अनिल होबुलाल कोसी हे शनिवारी रात्री साडे अकरा वाजता कॅम्प नं-३ छत्रपती शिवाजी महाराज चौकात चहा पिण्यासाठी गेले होते. चहा पितांना अवी नावाच्या तरुणाने त्यांच्याकडे गुटख्याची मागणी केली. मात्र गुटखा न दिल्याचा रागातून अवी, त्याचे साथीदार व वडील असे आठ जणांनी अनिल कोसी यांना मारहाण करून छाती व पायावर धारदार चाकूने वार केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अवीसह ८ जणांवर गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
 

Web Title: Beating out of anger for not giving Gutkha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.