धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 09:35 IST2023-01-23T09:34:40+5:302023-01-23T09:35:49+5:30

भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीका केली.

Balasaheb Shiv Sena will get the election symbol believes Education Minister Deepak Kesarkar | धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विश्वास

धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा विश्वास

कल्याण :

धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असल्याचा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कल्याणमध्ये व्यक्त केला. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावरही त्यांनी नाव न घेता टीका केली.

काेकण शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील माऊल हाॅलमध्ये शनिवारी जाहीर सभा झाली. सभेला सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, पदाधिकारी अनिल बाेरनारे, आर. पाटील, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहरप्रमुख रवी पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे आदी उपस्थित हाेते. 

म्हात्रे यांच्या प्रचारसभेत मनसेचे आमदार राजू पाटील यांचा फोटो लावण्यात आला होता. मात्र, पाटील यांनी अजून पाठिंब्याचा निर्णय झाला नसल्याचे म्हटले होते. दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार होणार हे निश्चित आहे. मागील सरकारच्या काळात पण त्याला उशीर झाला होता, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Balasaheb Shiv Sena will get the election symbol believes Education Minister Deepak Kesarkar