कल्याण - भाजपा पदाधिकारी ओमनाथ नाटेकर यांच्यावरील हल्ला प्रकरणात शिंदेसेनेचे दोन नगरसेवक व त्यांच्या दोन मुलांचा जामीन अर्ज कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी नाकारला. पोलिसांनी कलमात बदल का केला? असा सवाल उपस्थित करीत जामीन नाकारल्याने या चौघांचा आधारवाडी कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
पालिका निवडणुकीच्या आदल्या दिवशी पैसे वाटपावरून भाजप व शिंदेसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या राडा झाला. भाजपचे नाटेकर हे जखमी झाले. या प्रकरणी शिंदेगटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील व रवी पाटील यांच्यासह त्यांच्या दोन मुलांविरोधात गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी नितीन पाटील व रवी पाटील यांना अटक केली. त्या दोघांची प्रकृती खालावल्याने त्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केले होते. न्यायालयीन कोठडी मिळालेली असताना दोघांवर उपचार सुरू होते. २ फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाल्यावर पोलिसांनी त्यांना अटक केली. ३ फेब्रुवारी रोजी जेव्हा दोघांसह त्यांच्या मुलांना न्यायालयासमोर हजर केले तेव्हा हलिसांनी लावलेल्या कलमात बदल का केला असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता.
मेडिकल अन् एक्सरे रिपोर्ट का दिला नाही?
कल्याण न्यायालयाचे न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्यासमोर आरोपीचे वकील उमर काजी यांनी युक्तिवाद केला. त्यांची बाजू ठामपणे मांडली. कशाप्रकारे आमचे लोक गुन्हेगार नाहीत. प्रतिष्ठीत आहेत. गुन्ह्याचे स्वरूप तसे नव्हते. त्यांना न्यायालयाने जामीन द्यावा, अशी मागणी केली. न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेत पोलिसांनी कशाच्या आधारे कलमात बदल केला? इतकेच नाही तर मेडिकल आणि एक्सरे रिपोर्ट का दिला नाही? हा मुद्दा उपस्थित करीत चारही जणांना जामीन नाकारला.
Web Summary : Court denied bail to Shinde Sena's ex-corporators and their sons in the BJP official attack case, questioning police's changed sections and missing medical reports. Their jail stay continues.
Web Summary : भाजपा पदाधिकारी पर हमले के मामले में अदालत ने शिंदे सेना के पूर्व पार्षदों और उनके बेटों की जमानत याचिका खारिज कर दी। अदालत ने पुलिस द्वारा धाराओं में बदलाव और मेडिकल रिपोर्ट गायब होने पर सवाल उठाए। जेल में रहना जारी।