Video - कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं; भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:10 IST2022-02-28T14:21:43+5:302022-02-28T16:10:11+5:30

Kalyan-Dombivali News : भाजपाचे सोशल मीडियाचे प्रभारी मनोज कटके यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

attack on BJP's social media in-charge Manoj Katke in Kalyan-Dombivali | Video - कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं; भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

Video - कल्याण-डोंबिवलीत राजकारण तापलं; भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला

डोंबिवली - कल्याणडोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सेना आणि भाजपा यांच्यामधील वाद विकोपाला गेला असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपाचे सोशल मीडियाचे प्रभारी मनोज कटके यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. यामुळे भाजपाच्या गोटात संतापाचं वातवरण असून शहरातसुद्धा काहीसा तणाव आहे. 

कटके यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली. त्यानंतर जमिनीवर पाडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद झाली आहे. कटके यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. या घटनेचा तपास आज लागला पाहिजे, नाहीतर काय करायचं ते ठरवू अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांच्यामधील वाद पेटला असून चव्हाण यांच्यकडून अनेकदा पालकमंत्री शिंदे यांना टार्गेट केलं गेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात हे राजकारण आणखी कोणतं वळण घेत ते देखील पाहावं लागणार आहे.
 

Web Title: attack on BJP's social media in-charge Manoj Katke in Kalyan-Dombivali