टेम्पोचा कारला धक्का लागला म्हणून कार चालकाचा दोघांवर प्राणघातक हल्ला

By प्रशांत माने | Published: September 15, 2022 08:55 PM2022-09-15T20:55:24+5:302022-09-15T21:14:12+5:30

दोघांपैकी एकाचा मृत्यू.

As the tempo hit the car the car driver fatally attacked the two one died | टेम्पोचा कारला धक्का लागला म्हणून कार चालकाचा दोघांवर प्राणघातक हल्ला

टेम्पोचा कारला धक्का लागला म्हणून कार चालकाचा दोघांवर प्राणघातक हल्ला

googlenewsNext

डोंबिवली: टेम्पोचा कारला धक्का लागला म्हणून कारचालकाने दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री पावणेनऊच्या दरम्यान सोनारपाडा, शंकरानगर येथे घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते त्यातील एकाचा आज पहाटे मृत्यू झाला. विकास मिश्रा असे त्याचे नाव आहे. हल्ला करणारा कारचालक पंडीत म्हात्रे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.

उंबार्ली परिसरात राहणारे हर्षद रसाळ यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांचे काका बंडू रसाळ हे रविवारी रात्री सोनारपाडा शंकरानगर येथे टेम्पोतून मंडप डेकोरेशनचे सामान घेऊन जात होते. तेव्हा त्यांच्या टेम्पोचा अन्य एका कारला धक्का लागला. या कारणावरून कारचालक पंडित म्हात्रे यांनी वाद घालायला सुरूवात केली. यावेळी म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांनी टेम्पोत असलेल्या हर्षद रसाळ आणि अन्य एकाला शिवीगाळी करीत मारहाण केली. मारहाण करणारे त्यावरच थांबले नाहीत तर म्हात्रे यांनी हर्षदच्या पोटावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

यावेळी त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. त्यातील विकास मिश्रा हा हर्षदला सोडविण्यासाठी पुढे आला असता त्याच्यावर देखील वार करण्यात आले होते. यात विकास देखील गंभीर जखमी झाला होता. दोघा जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे चार वाजता मिश्राचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी आता या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: As the tempo hit the car the car driver fatally attacked the two one died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.