गर्दी केल्यास होणार कारवाई; फडके पथ, बाजीप्रभू चौक येथे जमावबंदी आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 17:22 IST2021-02-23T17:22:29+5:302021-02-23T17:22:46+5:30
Mobilazation order : कोरोनाची साथ अजूनही सुरू असून दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने फडके रोड, नेहरु रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक या ठिकाणी लोकांनी गर्दी करु नये.

गर्दी केल्यास होणार कारवाई; फडके पथ, बाजीप्रभू चौक येथे जमावबंदी आदेश
डोंबिवली : रामनगर पोलीसठाण्यातर्फे कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करण्यात आले. कोरोनाची साथ अजूनही सुरू असून दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने फडके रोड, नेहरु रोड, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौक या ठिकाणी लोकांनी गर्दी करु नये.
ठाणे आयुक्तालय परिसरात सीआरपीसी कलमाप्रमाणे जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला असून सदर मनाई आदेशाचा भंग केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मंगळवारी पोलिसांनी केले. लहान मुले व जेष्ठ नागरिक विना कारण बाहेर पडल्यास आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क चा वापर करून रोगाचा प्रादुर्भाव टाळावा असेही पोलिसांनी स्पष्ट केले.