अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार; आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:36 AM2023-12-10T09:36:23+5:302023-12-10T09:36:31+5:30

या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली  आहे.

A teacher's abuse of a minor girl The accused was arrested by Manpada police | अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार; आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली अटक

अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार; आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली अटक

डोंबिवली : एका आठ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी खाजगी शिक्षक अजितकुमार साहू याला अटक केली  आहे.

कल्याण पूर्वेत एका परिसरात राहणारा शिक्षक अजितकुमार साहू ‘जनरल नॉलेज’ या विषयाचे कोचिंग क्लासेस घेतो. या कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या एका आठ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी आल्यानंतर ती अस्वस्थ होती. तिची मानसिक स्थिती बघून नातेवाइकांनी तिची विचारपूस केली.  तिच्या नातेवाइकांनी विश्वासात घेतले आहे. तिने जे सांगितले ते ऐकून सर्वांना धक्काच बसला. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जात होता. लैंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणी नव्हता तर, ती ज्या ठिकाणी क्लासला जाते. त्याच क्लासचा शिक्षक तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता.

आरोपी होता पळून जाण्याच्या तयारीत

मुलीने ही हकीगत सांगितल्यावर मुलीच्या नातेवाइकांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशाेक होनमाने यांनी त्वरित संबंधित शिक्षक अजितकुमार साहूला अटक करण्यासाठी पोलिस पाठविले.

पोलिस त्याच्या घरी पोहचले. त्यावेळी तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिस अधिकारी सुनील तारमळे यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणात अजितकुमार साहूला अटक करण्यात आली आहे.

पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी निशा चव्हाण करीत आहेत.

Web Title: A teacher's abuse of a minor girl The accused was arrested by Manpada police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.