कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली

By मुरलीधर भवार | Updated: March 24, 2024 15:03 IST2024-03-24T15:02:48+5:302024-03-24T15:03:13+5:30

कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील डोंबिवली शहरात राहणारे शूर वीर कॅ.विनयकुमार सचान यांना  मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३ रोजी  वीरमरण आले.

A moving tribute by the Municipal Corporation on the memorial day of Captain Vinaykumar Sachan | कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली

कॅप्टन  विनयकुमार सचान यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली

डोंबिवली: आज कॅ. विनय कुमार सचान यांच्या स्मृती दिनी महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांनी,कॅ. विनय कुमार सचान  स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी  कॅ. विनयकुमार सचान यांचे माता-पिता, इतर कुटुंबीय तसेच महापालिका उपायुक्त अतुल पाटील, रमेश मिसाळ, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख  संजय जाधव, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे ,शैलेश मळेकर, सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप, भारत पवार यांनी  देखील कॅ.विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली. यासमयी इतर अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


कल्याण डोंबिवली महापालिका परिसरातील डोंबिवली शहरात राहणारे शूर वीर कॅ.विनयकुमार सचान यांना  मातृभूमीच्या रक्षणासाठी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना २४ मार्च २००३ रोजी  वीरमरण आले. त्यामुळे २४ मार्च या दिवशी  कॅ.विनयकुमार सचान यांचे स्मृतीप्रित्यर्थ महापालिकेतर्फे डोंबिवली येथील  वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील त्यांच्या स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात येते.

Web Title: A moving tribute by the Municipal Corporation on the memorial day of Captain Vinaykumar Sachan