कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला, धिम्या मार्गावरील लोकलचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 15:17 IST2024-10-19T15:16:49+5:302024-10-19T15:17:00+5:30
सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घसरलेला डबा रात्री उशिरा रुळावर आणण्यात आला. या घटनेमुळे धिम्या मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला होता.

कल्याण स्थानकात लोकलचा डबा घसरला, धिम्या मार्गावरील लोकलचा खोळंबा
डोंबिवली : कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे (सीएसएमटी) जाणाऱ्या धिम्या लोकलचा शेवटचा डबा शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घसरला. कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनवर ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घसरलेला डबा रात्री उशिरा रुळावर आणण्यात आला. या घटनेमुळे धिम्या मार्गावरील लोकलचा खोळंबा झाला होता.
प्रवाशांमध्ये गोंधळ
- कल्याण स्थानकातून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलचा डबा घसरल्याने फलाटावर गोंधळ निर्माण झाला. प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. फलाट दोनवरील प्रवाशांनी फलाट क्रमांक चारकडे धाव घेतली.
- तेथून त्यांनी गंतव्य ठिकाणाची लोकल पकडली. खडवली, आसनगाव, टिटवाळा दिशेकडून येणाऱ्या उपनगरीय गाड्यांचा या दुर्घटनेमुळे खोळंबा झाला होता.