कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 17:10 IST2025-05-04T17:10:02+5:302025-05-04T17:10:02+5:30

Woman Dies by Suicide In Kalyan: कल्याणमध्ये एका अज्ञात महिलेने रहिवाशी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी घेत आयुष्य संपवले.

35-Year Old Woman Dies by Suicide After Jumping from 17th Floor of Kalyan Building | कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

कल्याणमधील योगीधाम परिसरात एका ३५ वर्षीय महिलेने रहिवाशी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (०३ मे २०२५) संध्याकाळी घडल्याचे वृत्त आहे. मृत महिला सोसायटीतील रहिवासी नाही, अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली. आत्महत्यापूर्वी संबंधित महिला इमारतीच्या लिफ्टने १७ व्या मजल्यावर जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अत्महेत्येची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 

मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु, ती नेमके कुठे राहते, या इमारतीत नेमके कशासाठी आली होती आणि तिने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय का घेतला? पोलीस त्यामागचे कारण शोधत आहेत. या घटनेची माहिती देताना योगीधाम फेडरेशनचे अध्यक्ष नितीन जाधव यांना दुपारच्या सुमारास फोन आला की, एका महिलेने १७ व्या मजल्यावरून उडी मारली. ही महिला सोसायटीतील रहिवासी नसून ती बाहेरून आली होती.

दरम्यान, इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, महिला इमारतीत घुसल्यानंतर लिफ्टने १७ व्या मजल्यावर जाते. त्यानंतर १७ व्या मजल्यावरून उडी मारते. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


अत्यंत महत्त्वाचे, नक्की वाचा!
भारतात आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा आहे. अनेकदा लोक मानसिक तणावातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. परंतु, आत्महत्या कोणत्याही समस्येचे निवारण ठरू शकत नाही. कोणतीही समस्या किंवा अडचण असल्यास सर्वात प्रथम आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका. तसेच समस्येवर कशी मात करता येईल? याचा अधिक विचार करा. आपल्याकडून नकळत कोणतीही चूक झाली असेल तर घाबरू नका किंवा वाईट वाटून घेऊन नका. घरातील थोर किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींसमोर मन मोकळे करा, ते नक्कीच तुमची मदत करतील. 

Web Title: 35-Year Old Woman Dies by Suicide After Jumping from 17th Floor of Kalyan Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.