१५० फुटी महाकाय गुढी, चित्ररथानेही वेधले लक्ष; डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रा ठरली ऐतिहासिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 20:08 IST2026-03-19T20:04:38+5:302026-03-19T20:08:19+5:30

डोंबिवलीतील या गुढीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या गुढीचे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कौतुक केले. "ही गुढी केवळ एक प्रतिकृती नसून आपल्या विशाल हिंदुत्वाचे आणि गौरवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे.

150-foot giant Gudi, Chitrarath also attracted attention; New Year's welcome procession in Dombivli became historic | १५० फुटी महाकाय गुढी, चित्ररथानेही वेधले लक्ष; डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रा ठरली ऐतिहासिक

१५० फुटी महाकाय गुढी, चित्ररथानेही वेधले लक्ष; डोंबिवलीत नववर्ष स्वागतयात्रा ठरली ऐतिहासिक

सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीत यंदाचा गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागतयात्रा ऐतिहासिक ठरली. नेहरू मैदानात उभारलेली १५० फुटी महाकाय गुढी यंदाच्या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरली. हिंदुत्व आणि भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे प्रतीक म्हणून ही गुढी डौलाने उभी राहिली असून, या सोहळ्याने डोंबिवलीकरांच्या अभिमानात भर घातली.

डोंबिवलीतील या गुढीची सगळीकडे चर्चा सुरू आहे. या गुढीचे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी कौतुक केले. "ही गुढी केवळ एक प्रतिकृती नसून आपल्या विशाल हिंदुत्वाचे आणि गौरवशाली संस्कृतीचे प्रतीक आहे. श्री गणेश मंदिर संस्थानच्या माध्यमातून सुरू झालेल्या या स्वागतयात्रेचे हे २८ वे वर्ष होते. तरुण पिढीने भारतीय संस्कृतीशी नाते जोडून ठेवावे, या उद्देशाने ही परंपरा जोपासली जात असल्याचा सार्थ अभिमान चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. 

डोंबिवलीतील शोभायात्रेत यावर्षी दोन ठळक गोष्टींनी लोकांचे लक्ष वेधले 'वंदे मातरम्' या राष्ट्रगानाचे शतकोत्तरी सुवर्णमहोत्सवी (१५०वे) वर्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी (१००वे) वर्ष यावर आधारित डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवाराने २ चित्ररथ साकारले होते. या चित्ररथांच्या माध्यमातून डोंबिवलीच्या रस्त्यांवर राष्ट्रीयत्वाच्या विचारधारेचे दर्शन घडले.

 यंदा "क्रांतिकारी देशसेवक" या संकल्पनेवर आधारित वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ५ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ७५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांनीच उत्साहाने सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्याला २५,००० रुपये, तर उपविजेत्याला १५,००० रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

एकूणच, यंदाची डोंबिवलीची स्वागतयात्रा ही केवळ सांस्कृतिक उत्सव न राहता, ती देशप्रेम आणि हिंदुत्वाचा एक मोठा जागर ठरली आहे.

Web Title : डोंबिवली में नववर्ष उत्सव: 150 फीट की गुड़ी और झांकियां छाईं

Web Summary : डोंबिवली के नववर्ष उत्सव में 150 फीट ऊंची गुड़ी आकर्षण का केंद्र रही। शोभायात्रा में हिंदुत्व, संस्कृति और देशभक्ति की झलक दिखी। क्रांतिकारियों को सम्मानित करने वाली वेशभूषा प्रतियोगिता भी आयोजित की गई। कार्यक्रम भारतीय विरासत और एकता का प्रतीक था।

Web Title : Dombivli's New Year celebration: 150-foot Gudi and floats impress.

Web Summary : Dombivli's New Year celebration featured a massive 150-foot Gudi, attracting attention. The procession highlighted Hindutva, culture, and patriotism with themed floats and a costume contest honoring revolutionaries. The event celebrated Indian heritage and unity.