जुन्या पेन्शनसाठी १२०० शिक्षकांनी काढली बाईक रॅली
By अनिकेत घमंडी | Updated: March 20, 2023 17:35 IST2023-03-20T17:34:06+5:302023-03-20T17:35:41+5:30
कल्याणमधील पंचायत समिती कार्यालयापासून प्रेम ऑटो, बिर्ला कॉलेज, खडकपाडा मार्गे प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली.

जुन्या पेन्शनसाठी १२०० शिक्षकांनी काढली बाईक रॅली
कल्याण : एकच मिशन जुनी पेंशनच्या घोषणांनी आज कल्याण दुमदुमले. कल्याण पेंशन तालुका समन्वय समिती ने आयोजित केलेल्या आजच्या बाईक रॅली मध्ये १२०० शिक्षकशिक्षकेतर, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक व विविध शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते. कल्याणमधील पंचायत समिती कार्यालयापासून प्रेम ऑटो, बिर्ला कॉलेज, खडकपाडा मार्गे प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली.
कल्याण तालुका पेंशन समितीच्या माध्यमातून विविध शिक्षक संघटना, ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. या रॅलीत राहुल परदेशी अनिल बोरनारे, अनिल सांगळे, दिपक पाटिल, राजेश वेखंडे, अरूण बोंबे रविंद्र देवकर, दिपक धूमाळ, पंडीत गायकवाड, अनिता साळवे, गिरीष ठाकरे, संदिप गढरी, विनायक जाधव, कमलाकर पवार यांच्यासह शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. प्रांताधिकारी यांच्या वतीने नायब तहसिलदार रिताली परदेशी यांनी निवेदन स्विकारले.