शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

कामगारांच्या ‘पीएफ’चे ११० काेटी थकीत, केडीएमसीला ‘ईपीएफओ’ची नाेटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 01:48 IST

KDMC News : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेली नाही.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम २०११ ते २०१६ या कालावधीत भरलेली नाही. त्यामुळे भविष्य निर्वाह निधीच्या ठाणे कार्यालयाने महापालिकेस नोटीस बजावून थकीत असलेले ११० कोटी भरण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम कोरोनाकाळात तातडीने कुठून भरायची, असा प्रश्न महापालिकेसमोर उभा राहिला आहे.भविष्य निर्वाह निधीच्या सुधारित नियमानुसार नगर परिषदा व महापालिकांनी नेमलेल्या कंत्राटदाराने कंत्राटी कामगारांची पीएफ रक्कम भरणे बंधनकारक आहे. राज्यात बहुसंख्य पालिकांतील कंत्राटदारांनी ही रक्कम भरलेली नाही. पालिकेस भविष्य निर्वाह निधी भरण्यासाठीचा खाते क्रमांक हा २०१४ मध्ये मिळाला. त्यात नियमित पीएफची रक्कम भरणे आवश्यक हाेते. संबंधित कंत्राटदाराने कामाचा तपशील ठेवून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी भरणे बंधनकारक आहे. कंत्राटदारास पालिकेने नेमल्याने प्रशासनाकडे तपशील मागितला होता. पालिकेकडे असा तपशील नसल्याने भविष्य निर्वाह निधी खात्याने २०११ ते २०१६ दरम्यानचा पालिकेच्या जमा-खर्चाचा तपशील घेतला. त्यानुसार पालिकेस कंत्राटी कामगारांच्या पीएफच्या थकीत रकमेपोटी ११० कोटींची नोटीस बजावली आहे. ही रक्कम कंत्राटदारांनी भरली नाही तर पालिकेस भरावी लागणार आहे. काेराेनाला राेखण्यासाठी ९४ काेटी खर्चकोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेचे ९४ कोटींपेक्षा जास्त रुपये खर्च झाले आहेत. कोरोनामुळे करवसुलीवर परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडे महापालिकेने २१४ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कोरोनाकाळात सक्तीने करवसुली करू नये, असे म्हटले आहे. या कोरोनाकाळात ही नोटीस आल्याने इतकी मोठी रक्कम कंत्राटदारांनी भरली नाही तर महापालिका तरी कुठून भरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाEmployeeकर्मचारीProvident Fundभविष्य निर्वाह निधी