शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Pro Kabaddi League 2018 : गतविजेत्या पाटणा पायरेट्सचा दारुण पराभव; तमिळ थलायव्हाजची सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 9:18 PM

तमिळ थलायव्हाजचा ४२-२6 असा दणदणीत विजय

चेन्नई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला आजपासून चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सुरूवात झाली. या पर्वात प्रत्येक संघात बरेच बदल झाले असल्यामुळे ही उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली. पण, गतविजेत्या पाटणा पायरेट्सला सलामीलाच पराभव पत्करावा लागला. तमिळ थलायव्हाजने ४२-२6 असा दणदणीत विजय मिळवला. 

पाटणाला पहिल्याच सामन्यात थलायव्हाजने चांगलेच झुंजवले. पहिल्या सत्रात एक लोण चढवताना थलायव्हाजने २६-८ अशी भक्कम आघाडी घेतली. पहिल्या सत्रात अजय ठाकूर (७) आणि सुरजीत सिंग (६) यांचा दबदबा जाणवला. 

मध्यंतरानंतही थलायव्हाजने लोण चढवत सुरुवातीलाच गतविजेत्यांना कोंडीत पकडले. त्यांनी ३२-८ अशी आघाडीत भर घातली. पाटणाच्या प्रदीप नरवालने एकाकी झुंज दिली. अजय ठाकूरने पुन्हा एकदा सुपर १० गुणांची कमाई केली. 

पाटणाने त्यानंतर सामन्यात पुनरागमनाचे केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले. थलायव्हाजने हा सामना ४२-२६ असा सहज जिंकला. अजय ठाकूरने सर्वाधिक 14 गुण कमावले. दुसऱ्या सत्रात पाटणाला थलायव्हाजवर एक लोण चढवण्यात यश आले. 

 

टॅग्स :Pro-Kabaddiप्रो-कबड्डी