Asian Games 2018: भारतीय कबड्डी संघाकडून बांगलादेशचा धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 14:10 IST2018-08-19T14:09:55+5:302018-08-19T14:10:39+5:30
पहिल्याच लढतीत भारताने बांगलादेशचा 50-21 असा धुव्वा उडवला.

Asian Games 2018: भारतीय कबड्डी संघाकडून बांगलादेशचा धुव्वा
ठळक मुद्दे भारताच्या कबड्डी पुरुष संघाने आशियाई कबड्डी स्पर्धेत दमदार बोहनी केली.
जकार्ता : भारताच्या कबड्डी पुरुष संघाने आशियाई कबड्डी स्पर्धेत दमदार बोहनी केली. पहिल्याच लढतीत भारताने बांगलादेशचा 50-21 असा धुव्वा उडवला.
Just in: Kabaddi | Indian Men start on a winning note as they thrash Bangladesh 50-21 #AsianGames2018
— India@AsianGames2018 (@India_AllSports) August 19, 2018
भारताच्या संघाने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण केले. बांगलादेशच्या संघाला आपण सहज पराभूत करू शकू, हा विश्वास त्यांच्यामध्ये होता. त्यामुळे दोन्ही सत्रांमध्ये त्यांनी बांगलादेशला डोकेवर काढू दिले नाही. खोलवर चढाया आणि चांगला बचाव हे या यशाचे गमक ठरले.