12 बायका, 102 मुले अन् 578 नातवंडे, विसरून जातो आपल्या मुलांच नावे....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2023 13:05 IST2023-06-08T13:03:24+5:302023-06-08T13:05:19+5:30
Trending News: इतकी मुलं झाल्यानंतर त्याने त्याचा विचार बदलला. तो गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्याचा विरोध करतो आणि त्याऐवजी आपल्या पत्नींना कंट्रोल करण्यासाठी गोळ्या देतो.

12 बायका, 102 मुले अन् 578 नातवंडे, विसरून जातो आपल्या मुलांच नावे....
Trending News: युगांडाच्या लुसाकामध्ये एका 68 वर्षीय व्यक्तीला 12 पत्नी आहेत. ज्यांच्याकडून त्याला 103 मुलं आणि 578 नातवंडं आहेत. मूसा हसाह्या कसेरा असं या व्यक्चतीच नाव असून त्याने हे मान्य केलं की, त्यांनी कधी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केला नाही. इतकी मुलं झाल्यानंतर त्याने त्याचा विचार बदलला. तो गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करण्याचा विरोध करतो आणि त्याऐवजी आपल्या पत्नींना कंट्रोल करण्यासाठी गोळ्या देतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मूसा म्हणाला की, 'सगळ्यात मोठी अडचण ही आहे की, तो त्याच्या पहिल्या आणि शेवटी जन्माला आलेल्या मुलांची नावे लक्षात ठेवू शकत नाही. काही मुलांना तर मी विसरलोही आहे आणि मला त्यांची नावेही आठवत नाहीत'. AFP च्या एका रिपोर्टनुसार, मूसा केवळ 17 वर्षांचा होता तेव्हा त्याने 1972 मध्ये पहिलं लग्न केलं. पण नंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला अधिक लग्न करण्याचा आणि मुलांना जन्म देण्याचा सल्ला दिला. जेणेकरून परिवार मोठा व्हावा.
आपल्या कुटुंबियांच्या आणि नातेवाईकांच्या सांगण्यानुसार मूसाने 12 महिलांसोबत लग्न केलं आणि त्यानंतर तो 102 मुलांचा पिता झाला. पण त्याला आता याचा पश्चाताप होतो कारण त्यांचं जेवण, शिक्षण आणि कपड्यांचा खर्च तो उचलू शकत नाही. त्याच्या दोन पत्नींनी त्याला आधीच सोडलं आहे.
तो म्हणाला की, 'मी आता आणखी मुलं होण्याची अपेक्षा नाहीये. कारण इतक्या मुलांना जन्म देऊन मला हे समजलं आहे की, इतक्या मुलांची जबाबदारी मी घेऊ शकत नाही'.
मूसा पुढे म्हणाला की, माझं आरोग्यही वयानुसार बिघडत आहे आणि इतक्या मोठ्या परिवारासाठी केवळ दोन एकर जमीन आहे. मी सध्या बेरोजगार आहे. मूसा कथितपणे गावात पर्यटकांसाठी एक आकर्षण बनला आहे. दरम्यान एकापेक्षा जास्त लग्ने युगांडामध्ये कायदेशीर आहेत आणि ही येथील एक पारंपारिक प्रथा आहे.