'या' फळाची किंमत आहे इतकी की तुम्ही म्हणाल यापेक्षा सोनं खरेदी करतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:53 IST2021-11-05T16:53:24+5:302021-11-05T16:53:42+5:30

आपल्याकडे कांद्याचे भाव जरा वाढले तर सगळीकडे चर्चा सुरु होते. पण जगात फळं किती महाग विकली जातील याचा कधी विचार केला आहे का? आपण सर्वांनी सफरचंद, संत्री, द्राक्षे, आंबा खाल्ला आहे, पण लाखो रुपये किमतीचे फळ खाल्ले आहे का? 

Yubari melon is japan is the most expensive muskmelon in the world | 'या' फळाची किंमत आहे इतकी की तुम्ही म्हणाल यापेक्षा सोनं खरेदी करतो...

'या' फळाची किंमत आहे इतकी की तुम्ही म्हणाल यापेक्षा सोनं खरेदी करतो...

तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महाग फळ कधी खाल्लं आणि त्याची किंमत काय असेल? कदाचित ते १०० ते जास्तीत जास्त ौ हजार रुपयांपर्यंत असेल. पण एखाद्या फळाची किंमत लाखो रुपये असेल तर…? आपल्याकडे कांद्याचे भाव जरा वाढले तर सगळीकडे चर्चा सुरु होते. पण जगात फळं किती महाग विकली जातील याचा कधी विचार केला आहे का? आपण सर्वांनी सफरचंद, संत्री, द्राक्षे, आंबा खाल्ला आहे, पण लाखो रुपये किमतीचे फळ खाल्ले आहे का? 

सोन्याच्या किमतीपेक्षा महाग फळ
जगात अनेक धक्कादायक घटना घडत असतात, ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल. फॅन्सी फळे खाण्याची क्रेझही काही लोकांमध्ये दिसून येते, ज्याची किंमत १०० रुपयांपासून ते जास्तित जास्त १ हजार रुपयांपर्यंत असू शकते. मात्र, आता आम्ही तुम्हाला अशा एका फळाबद्दल सांगणार आहोत, ज्याची किंमत लाखोंत आहे. हे फळ खाण्यापूर्वी तुम्ही नक्कीच विचार कराल की, आपण हे फळ घेण्यापेक्षा सोन्यात गुंतवणूक करू शकतो. होय, हे महागडे फळ खरेदी करण्यासाठी लोकांनी लिलावात भाग घ्यावा लागतो.

जपानचं सर्वात महागडं खरबुज
या फळाला युबरी खरबूज म्हणतात, हे आपल्याकडील खरबूजासारखंच आहे. हे जगातील सर्वात महाग फळ असल्याचे सांगितले जाते. हे फळ फक्त जपानमध्ये विकलं जातं आणि फक्त श्रीमंत लोकच ते विकत घेऊ शकतात. जपानचे युबरी खरबूज केवळ जपानच्या युबारी प्रदेशात पिकवलं जातं. यापैकी दोन युबरी कस्तुरी खरबूजांनी 2019 मध्ये विक्रमी किंमत मिळवली, जेव्हा त्यांचा $45,000 म्हणजे अंदाजे 33,00,000 रुपये. युबरी सामान्य खरबुजासारखंच दिसतं,पण त्याची चव खूप गोड असते, ते आतून केशरी रंगाचं असतं.

Web Title: Yubari melon is japan is the most expensive muskmelon in the world