कोण आहे हा YouTuber? व्हिडिओ बनवण्याासाठी उभारले शहर, खर्च केले ₹ 119 कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:53 IST2024-12-12T15:53:41+5:302024-12-12T15:53:41+5:30
YouTuber MrBeast : हा जगातील सर्वात मोठा YouTuber आहे.

कोण आहे हा YouTuber? व्हिडिओ बनवण्याासाठी उभारले शहर, खर्च केले ₹ 119 कोटी
YouTuber MrBeast : अमेरिकेत राहणारा जिमी स्टीफन डोनाल्डसन उर्फ मिस्टर बीस्ट, हा जगातील सर्वात मोठा YouTuber आहे. आपल्या अनोख्या आणि भव्य-दिव्य व्हिडिओसाठी मिस्टर बीस्ट ओळखला जातो. येत्या 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या 'बीस्ट गेम्स' या नवीन रिॲलिटी शोची त्याने नुकतीच घोषणा केली. यासाठी त्याने टोरंटोमध्ये चक्क एक शहर उभारले आहे.
ऐकून चकीत व्हाल, पण फक्त व्हिडिओसाठी मिस्टर बीस्टने एक भव्य सेट उभारला आहे, जो एखाद्या शहरापेक्षा कमी नाही. तब्बल 14 मिलियन डॉलर्स (सुमारे 119 कोटी रुपये) खर्चून बांधलेल्या या सेटवर लवकरच स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करताना दिसणार आहेत. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सेटचे फोटोही शेअर केले आहेत.
'बीस्ट गेम्स' शोबद्दल एका यूजरने कमेंट केली की, केवळ 25 मिनिटांच्या व्हिडिओसाठी पाण्यासारखे पैसे खर्च करणे योग्य नाही. यावर मिस्टर बीस्टने उत्तर दिले, हा केवळ 25 मिनिटांचा व्हिडिओ नाही, तर 10 भागांचा शो आहे, जो तुम्ही पुढील आठवड्यापासून Amazon Prime वर पाहणार आहे.
We spent $14,000,000 building a city in a field for the contestants in Beast Games to live and compete in.. December 19th is almost here 🥰 pic.twitter.com/gFxjTq5CFD
— MrBeast (@MrBeast) December 8, 2024
शो करण्यासाठी किती खर्च आला?
मिस्टर बिस्टने अलीकडेच एका मुलाखतीत सांगितले की, हा शो बनवण्यासाठी एकूण 100 मिलियन डॉलर (सुमारे 850 कोटी रुपये) खर्च करण्यात आला आहे. एवढंच नाही, तर आतापर्यंत 40 हून अधिक विश्वविक्रमही मिस्टर बीस्टच्या नावे नोंदवले गेले आहेत.
जगातील सर्वात मोठा youtuber
जिमीच्या YouTube चॅनेलवर आतापर्यंत 335 मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. या संख्येसह तो जगातील सर्वात मोठा YouTuber बनला आहे. 7 मे 1998 रोजी कॅन्ससमधील विचिटा येथे जन्मलेल्या जिमीने 'Worst Intros on YouTube' नावाचा व्हिडिओ पोस्ट केला. येथून तो लोकप्रिय झाला आणि त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. 19 फेब्रुवारी 2012 रोजी त्याने त्याचे YouTube चॅनल सुरू केले आणि 2016 पासून पूर्ण वेळ YouTuber बनण्यासाठी कॉलेजही सोडले. मिस्टर बीस्ट 2014 मध्ये ट्विटरवर आला, येथे त्याचे 31.3 मिलियन फॉलोअर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर 63.1 मिलियन लोक त्याला फॉलो करतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिस्टर बीस्टकडे $500 मिलियनची संपत्ती आहे.