काहीतरी वेगळं करण्याच्या नादात 7 दिवस जिवंत दफन राहिला, बाहेर येताच रडू लागला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 12:32 PM2023-11-22T12:32:32+5:302023-11-22T12:34:20+5:30

या व्हिडिओला 57 मिलियन व्ह्यूज मिळाले. भरपूर लोक यावर कमेंट्स करत आहेत. ही व्यक्ती एक यूट्यूबर आहे ज्याचं नाव मिस्टर बीस्ट आहे.

Youtuber buried alive for 7 days cries feels mental agony mrbeast youtuber watch video | काहीतरी वेगळं करण्याच्या नादात 7 दिवस जिवंत दफन राहिला, बाहेर येताच रडू लागला!

काहीतरी वेगळं करण्याच्या नादात 7 दिवस जिवंत दफन राहिला, बाहेर येताच रडू लागला!

काहीतरी नवीन आणि वेगळं करण्याच्या नादात लोक भलंतच काही करून बसतात. एका व्यक्तीचा असाच एक भयानक कारनामा समोर आला आहे. त्याने वेगळं काही करण्यासाठी एक स्टंट केला. ज्यात तो 7 दिवस जिवंत दफन राहिला. तो म्हणाला की, एक आठवडा अशा स्थितीत राहिल्यानंतर आता त्याला मानसिक त्रास होत आहे. त्याच्या या व्हिडिओला 57 मिलियन व्ह्यूज मिळाले. भरपूर लोक यावर कमेंट्स करत आहेत. ही व्यक्ती एक यूट्यूबर आहे ज्याचं नाव मिस्टर बीस्ट आहे.

मिस्टर बीस्टचं खरं नाव जिम्मी डोनाल्डसन असं आहे. 25 वर्षीय या व्यक्तीने स्टंट केल्यावर सांगितलं की, प्लीज हे घरी ट्राय करू नका. हा तरूण जगातील सगळ्यात फेमस आणि श्रीमंत यूट्यूबरपैकी एक आहे. दर महिन्याला जाहिरातींच्या माध्यमातून त्याची 3 ते 5 मिलियन डॉलरची कमाई आहे. तो नेहमीच काहीतरी वेगळं आणि हैराण करणारं करतो म्हणून त्याचे व्हिडीओ पाहिले जातात.

व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, मिस्टर बीस्ट एका बॉक्समध्ये लेटतो, ज्यात गादी, खाण्या-पिण्याच्या वस्तूंसोबतच इतरही सुविधा आहेत. आधी खोल गड्डा करण्यात आला आणि नंतर त्यावर माती टाकून बुजवण्यात आला.

यानंतर तो या बॉक्समध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करतो. तर बाहेर काही लोक उभे दिसतात. बीस्ट म्हणाला की, मी पुढच्या सात दिवसांसाठी माझं जीवन या बॉक्सच्या हवाली करत आहे. इतकी सुरक्षा असूनही बीस्टच्या मानसिक स्थितीवर याचा बराच प्रभाव पडला. तो अनेकदा रडतानाही दिसला. असं करून मिस्टर बीस्ट याने स्वत:चाच रेकॉर्ड तोडला. याआधी तो 50 तास जिवंत दफन राहिला होता.

Web Title: Youtuber buried alive for 7 days cries feels mental agony mrbeast youtuber watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.