तरुणाने मॉलमध्ये केली चोरी, CCTVवर नजर पडताच सुरू केला डान्स; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 19:31 IST2021-11-15T19:31:09+5:302021-11-15T19:31:19+5:30
हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, यावर हजारो लाइक्स आणि कमेंट्स येत आहेत.

तरुणाने मॉलमध्ये केली चोरी, CCTVवर नजर पडताच सुरू केला डान्स; पाहा VIDEO
सोशल मीडियावर दररोज अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हायरल व्हिडिओ पाहून हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा चोरी करताना दितोय. पण, जेव्हा त्याची नजर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडते, तेव्हा तो काय करतो हे पाहणे मजेशीर आहे.
व्हिडिओमध्ये एक मुलगा चोरी करताना दिसत आहे. रॅकवरुन एक पॅकेट तो त्याच्या टी-शर्टमध्ये ठेवतो. पण, नंतर त्याची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर पडते. मग काय, कॅमेरा बघितल्यावर तो घाबरतो. त्यानंतर तो अचानक 'डान्स' सुरू करतो आणि पॅकेट ठेवून देतो. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटीझन यावर विविध कमेंट्स करत आहेत.
टायरेस नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर हजारो लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ आतापर्यंत 6 लाख 58 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर हजाराहून अधिक लोकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.