"सोने पे सुहागा" ही हिंदी म्हण तर अनेकदा ऐकली असेल, पण यातील 'सुहागा'चा अर्थ काय होतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 17:54 IST2025-07-18T17:50:37+5:302025-07-18T17:54:51+5:30

Interesting Facts : एक प्रसिद्ध म्हण म्हणजे "सोने पे सुहागा". ज्याचा अर्थ होतो, एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये आणखी चांगली गोष्टी जाडून चांगलं करणं.

You may have heard the Hindi proverb "Sone pe Suhaga" many times, now know what Suhaga means | "सोने पे सुहागा" ही हिंदी म्हण तर अनेकदा ऐकली असेल, पण यातील 'सुहागा'चा अर्थ काय होतो?

"सोने पे सुहागा" ही हिंदी म्हण तर अनेकदा ऐकली असेल, पण यातील 'सुहागा'चा अर्थ काय होतो?

Interesting Facts : हिंदी भाषेतील अनेक म्हणी रोजच्या जीवनात नेहमीच वापरल्या जातात. या छोट्या छोट्या म्हणी संवाद सोपा करतात. या म्हणींमध्ये मोठा अर्थ दडलेला असतो. अशीच एक प्रसिद्ध म्हण म्हणजे "सोने पे सुहागा". ज्याचा अर्थ होतो, एखाद्या चांगल्या गोष्टीमध्ये आणखी चांगली गोष्टी जोडून गोष्ट चांगली करणं किंवा होणं.

या म्हणीचा वापर अनेकदा सहजपणे केला असेल आणि अनेकांनी ही ऐकलीही असेल. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, या म्हणीतील सुहागाचा अर्थ काय असतो? नक्कीच केला नसेल. तेच आज पाहुयात.

"सोने पे सुहागा" म्हणीचा अर्थ

सोनं आधीच मौल्यवान असतं आणि सुहागा लावून त्याची चमक आणखी वाढवली जाते. त्याचप्रमाणे ही म्हण एखाद्या चांगल्या गोष्टीत आणखीन चांगली बाब जोडली गेल्यावर वापरली जाते.

सुहागा काय आहे?

सुहागाला इंग्रजीमध्ये बोरॅक्स (Borax) म्हटलं जातं. हे एक नॅचरल मिनरल आहे. याचं केमिकल नाव सडिअम बोरॅट आहे. हे पावडर किंवा क्रिस्टलच्या रूपात मिळतं. याचा वापर अनेक घरगुती कामात, उद्योगात आणि आयुर्वेदिक उपचारांमध्ये केला जातो.

कसा होतो वापर?

सोन्याची चमक वाढवण्यासाठी सुहागाचा सगळ्यात जास्त वापर केला जातो. तसेच चांदीचे दागिणे साफ करण्यासाठी आणि चमकवण्यासाठी सुद्धा हे वापरलं जातं. यानं धातुमधील अशुद्धता दूर केली जाते. त्यामुळेच "सोने पे सुहागा" अशी ही म्हण आहे.

आयुर्वेदिक औषधी - सुहागाचा वापर पारंपारिक उपचारात खोकला, घशातील खवखव, जॉइंट्समधील दुखणं दूर करण्यासाठी केला जातो.

कपडे धुण्यासाठी- आधी सुहागाचा वापर कपडे धुण्यासाठी आणि त्यांवरीग डाग दूर करण्यासाठी केला जात होता.

Web Title: You may have heard the Hindi proverb "Sone pe Suhaga" many times, now know what Suhaga means

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.