'या' दोन कुत्र्यांचा करायचाय सांभाळ, पगाराची ऑफर वाचून नोकरीसाठी पळत पोहोचाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 12:00 IST2019-11-27T11:58:08+5:302019-11-27T12:00:37+5:30
या रिट्रीवर प्रजातीच्या कुत्र्यांची नावे मायलो आणि ऑक्सर अशी आहेत. या कुत्र्याच्या मालकांनी नोकरी जाहिरात Sliver Swan Search नावाच्या वेबसाइटवर दिली आहे.

'या' दोन कुत्र्यांचा करायचाय सांभाळ, पगाराची ऑफर वाचून नोकरीसाठी पळत पोहोचाल!
लंडनच्या नाइट्सब्रिजमध्ये राहणाऱ्या कपलकडे एक अशी नोकरी आहे ज्याने तुम्हाला धक्का बसू शकतो. कामासाठी दोघेही बाहेरच राहतात. अशात त्यांना त्यांच्या दोन कुत्र्यांची काळजी घेणारी एक व्यक्ती हवी आहे. यासाठी ते ३० ते ३२ हजार पाउंड म्हणजेच साधारण २९ लाख रूपये पगार देत आहेत. तसेच त्यांच्या सहा मजली आलिशान घरात राहण्यास जागाही दिली जाणार आहे.
या रिट्रीवर प्रजातीच्या कुत्र्यांची नावे मायलो आणि ऑक्सर अशी आहेत. या कुत्र्याच्या मालकांनी नोकरी जाहिरात Sliver Swan Search नावाच्या वेबसाइटवर दिली आहे. यात त्यांनी सांगितलंय की, त्यांना या कामासाठी कशाप्रकारची व्यक्ती हवी आहे.
कपलने जाहिरतीत लिहिले आहे की, व्यक्तीने आधी कुत्र्यांना सांभाळण्याचं काम केलेलं असावं. हाउसकिपिंगमध्ये अनुभव असायला हवा. जर जेवण तयार करता येत असेल तर फारच चांगलं. तसेच व्यक्ती फिट, अॅक्टिव आणि विश्वासू असावा. आठवड्यातील ५ दिवस काम करावं लागले. त्याला आम्ही २९ लाखापेक्षा अधिक पगार देऊ.