'या' मंदिरात जाण्यास घाबरतात लोक, 'हे' जगातलं असं एकमेव मंदिर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 11:40 IST2019-11-02T11:35:42+5:302019-11-02T11:40:41+5:30
तसे तर जगभरातील लोक त्यांच्या समस्या दूर करण्याची कामना घेऊन मंदिरांमध्ये जातात.

'या' मंदिरात जाण्यास घाबरतात लोक, 'हे' जगातलं असं एकमेव मंदिर....
तसे तर जगभरातील लोक त्यांच्या समस्या दूर करण्याची कामना घेऊन मंदिरांमध्ये जातात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, भारतात एक असंही मंदिर आहे, ज्यात कुणीही जात नाही किंवा या मंदिरात जाण्यास लोक घाबरतात. आता या मंदिरात असं काय आहे की, लोक या मंदिरात जाण्यास घाबरतात?
हे मंदिर आहे मृत्यूचा देव यमराजचं आहे. हेच कारण आहे की, लोक या मंदिराच्या शेजारून जाण्यासही घाबरतात. हे जगातलं एकमेव असं मंदिर असेल जे यमराजाला समर्पित आहे. लोकांचं म्हणणं आहे की, या मंदिराला यमराजासाठी तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे यात त्यांच्याशिवाय कुणीही प्रवेश करू शकत नाही.
गोवातील लोक सांगतात की, या मंदिरात चित्रगुप्तसाठीही एक खास जागा तयार करण्यात आली आहे. यात ते मनुष्याच्या चांगल्या-वाईट कामांचा लेखाजोखा ठेवतात. असेल म्हटले जाते की, या मंदिरात चार छुपे दरवाजे आहेत आणि हे दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या धातूंपासून तयार केले आहेत. असे मानले जाते की, जे लोक जास्त पाप करतात, त्यांची आत्मा लोखंडाच्या दरवाजाने आत जाते, तर ज्याने पुण्य केलंय त्यांची आत्मा सोन्याच्या दरवाज्यातून आत जाते.
या मंदिराला लोक धर्मेश्वर महावेद मंदिर, धरमराज मंदिर आणि यमराज मंदिर म्हणून ओळखतात. मुळात हिमाचलमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. हेही त्यांपैकी एक आहे. पण या इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरात लोक जात नाही. ज्यांना नमस्कार करायचाय ते बाहेरूनच करतात.