शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आई थोर तुझी माया! बाळाला दुध पाजल्यानंतर होतो आईचा मृत्यू तरीही चिमुकल्याचं पोट भरते अन् मृत्यूला कवटाळते

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 14:44 IST

एका आईचा शोध लंडनमधल्या शास्रज्ञांनी घेतला आहे. एका कृमीवर हे संशोधन (Worm) करण्यात आलं, ज्यात आई मुलांना दूध पाजल्यानंतर मरते. असे का होते? घ्या जाणून...

आईच्या प्रेमाबद्दल बोलावं तितकं कमी आहे, आईच्या प्रेमाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. मग तो माणूस असो वा प्राणी. आई ही सारखीच असते. तिच्या बाळासाठी झटणारी, झगडणारी, त्याला हवं ते पुरवणारी आणि प्रसंगी आपले प्राणही देऊन त्याला नवजीवन देणारी. अशाच एका आईचा शोध लंडनमधल्या शास्रज्ञांनी घेतला आहे. एका कृमीवर हे संशोधन (Worm) करण्यात आलं, ज्यात आई मुलांना दूध पाजल्यानंतर मरते. दूध बनवण्याच्या प्रक्रियेत आणि मुलांना दूध पाजण्याच्या प्रक्रियेत आई कमकुवत होते आणि शेवटी मरते. 

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या (University College London) मते, ही प्रक्रिया नेमाटॉड कृमीमध्ये (Nematod Worm) सापडते. ही मादी अळी निस्वार्थीपणे आपल्या मुलासाठी दूध बनवते आणि नंतर मरते. आता या संशोधनाद्वारे हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो की, माणसांमधील वृद्धत्व कसं थांबवता येईल? या संशोधनाचे प्रमुख प्रोफेसर डेव्हिड जेम्स यांच्या मते, जर हे संशोधन यशस्वी झाले तर माणसांचं वृद्धत्व थांबवता येऊ शकतं.

ही कृमी कशाप्रकारे मरते?आतापर्यंत संशोधनात असे समोर आले आहे की, हे कृमी शरीरात एक विशेष प्रकारचे द्रव तयार करतात. हा द्रव पिवळ्या रंगाचा असतो. जो मादी अळीच्या आत तयार होतो. हा द्रव पदार्थ अम्लीय घटकांनी बनलेला आहे, जो आतल्या आत त्या कृमीचं शरीर खातो. यामुळे मादीचे शरीर सडण्यास सुरुवात होते आणि काही वेळातच तिचा मृत्यू होतो. याशिवाय, हे कीटक स्वतःच्या वजनापेक्षा जास्त अंडी घालतात हेही त्यामागंचं एक कारण आहे.

मृत्यूचं कारण नक्की काय?संशोधक म्हणतात की, हे कृमी त्यांच्या शरीरातील पोषक द्रव्यं त्यांच्या मुलांना हस्तांतरित करतात. हेच पोषक घटक या कृमींना जिवंत ठेवत असतात. पण एक मादी तिच्या बाळाला जिवंत ठेवण्यासाठी हे हस्तांतरित करते. यामुळे, अंड्यातून बाहेर आल्यानंतर मूल मजबूत होते, परंतु आईचा मृत्यू होतो. संशोधक आता या पद्धतीमागील प्रक्रिया जाणून घेण्यात गुंतलेले आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की ही प्रक्रिया समजल्यास माणसाची आयुमर्यादा वाढवणं शक्य आहे. त्यामुळे माणसं जास्त काळ जगु शकतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेLondonलंडनmilkदूध