शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

'या' तुरूंगात एका कैद्यावर वर्षाला खर्च केले जातात ९३ कोटी रूपये, सुरक्षेचा खर्च वाचून जाल चक्रावून!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:35 PM

सामान्यपणे तरूंगाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा वेगवेगळे प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतात. म्हणजे तेथील सुरक्षा, कैद्यांना कसं जेवण मिळतं, ते कसे राहत असतील इत्यादी इत्यादी.

(All Image Credit : Social Media)

सामान्यपणे तरूंगाचा जेव्हा विषय निघतो तेव्हा वेगवेगळे प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतात. म्हणजे तेथील सुरक्षा, कैद्यांना कसं जेवण मिळतं, ते कसे राहत असतील इत्यादी इत्यादी. अनेक सिनेमांमध्ये आपण पाहिलेलं असतं की, कैद्यांचं तुरूंगातील जगणं हे कुणाच्याही नशीबी येऊ नये. मात्र, क्यूबामध्ये एक असा तुरूंग आहे, जिथे या सर्व गोष्टींचा विचार करण्याला काहीच अर्थ उरत नाही. कारण या तुरूंगात एका कैद्यावर कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. त्यामुळेच हा तुरूंग जगातला सर्वात महागडा तुरूंग मानला जातो.

क्यूबातील या तुरूंगाचं नाव आहे ग्वांतानमो बे. ग्वांतानमो खाडीजवळ हा तुरूंग असल्याने याला ग्वांतानमो बे असं नाव देण्यात आलं आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, या तुरूंगात सध्या ४० कैदी आहेत आणि प्रत्येकावर वर्षाला साधारण ९३ कोटी रूपये खर्च केले जातात.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, या तुरूंगात साधारण १८०० सुरक्षा रक्षत तैनात आहेत. इथे केवळ एका कैद्यामागे ४५ सैनिकांची नियुक्ती केली गेली आहे. या तुरूंगात सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या सैनिकांवर तर वर्षाला ३९०० कोटी रूपये खर्च केले जातात.

आता तुम्ही विचार करत असाल की, या तुरूंगात कैद्यांना एवढी सुरक्षा का दिली जाते? या तुरूंगात सर्वात धोकादायक गुन्हेगारांना ठेवलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार,  ९/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड खालिद शेख मोहम्मद हा याच तुरूंगात कैद आहे.

या तुरूंगाच्या तीन इमारती आहेत. दोन गुप्त मुख्यालये आणि तीन हॉस्पिटल. त्यासोबतच इथे वकिलांसाठीही वेगवेगळे कंपाउंड तयार करण्यात आले आहेत. जिथे कैदी त्यांच्याशी बोलतात. येथील स्टाफ केद्यांसाठी चर्च आणि सिनेमा बघण्याची व्यवस्था देखील आहे. तर इतर कैद्यांसाठी जिम आणि प्ले स्टेशनची व्यवस्था आहे.

आधी ग्वांतानमो बे मध्ये अमेरिकेचा नेव्ही बेस होता. पण नंतर याला डिटेंशन सेंटर करण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी इथे एक कंपाउंड तयार केलं होतं. ज्यात दहशतवाद्यांना ठेवलं जातं. या कॅम्पला एक्स-रे नाव देण्यात आलं आहे.

टॅग्स :jailतुरुंगJara hatkeजरा हटके