खतरनाक! तुम्ही कधी निळ्या डोळ्यांचा साप पाहिलाय का? मध्य प्रदेशातील जंगलात दिसला असा साप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 16:40 IST2021-07-16T16:38:47+5:302021-07-16T16:40:26+5:30
World Snake Day : निळ्या डोळ्यांचा रसल वायपर फारच सुंदर दिसत आहे. कोणत्याही रसल वायपर सापाचे डोळे एका ठराविक अवस्थेत निळे होत असतात.

खतरनाक! तुम्ही कधी निळ्या डोळ्यांचा साप पाहिलाय का? मध्य प्रदेशातील जंगलात दिसला असा साप...
तुम्ही कधी निळ्या डोळ्यांचा रसल वायपर साप बघितलाय. १६ जुलै हा जागतिक सर्प दिवस (World Snake Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवसानिमित्त आम्ही तुम्हाला निळ्या डोळ्यांचा साप दाखवणार आहोत. मध्य प्रदेशातील बैतूलच्या सारणी भागात हा रसल वायपर साप आढळून आला. सारणीमध्ये या सापाला रेस्क्यू करण्यात आल्यावर लोकांना दिसलं की, या सापाडे डोळे निळे आहेत.
निळ्या डोळ्यांचा रसल वायपर फारच सुंदर दिसत आहे. कोणत्याही रसल वायपर सापाचे डोळे एका ठराविक अवस्थेत निळे होत असतात. मात्र पहिल्यांदा हा नजारा कॅमेरात कैद झाला आहे. सर्प तज्ज्ञ आदिल यांनी सांगितलं की, जेव्हा साप आपली कात टाकतो तेव्हा त्या काळाला शेडिंग पिरिअड म्हटलं जातं. या अवस्थेत त्यांच्या डोळ्यांची जुनी त्वचा आणि नव्या त्वचेमध्ये एक तरल पदार्थ जमा होऊ लागतो. जसजसा कात टाकण्याचा वेळ जवळ येऊ लागतो. सापांचे डोळे तरल पदार्थामुळे निळ्या रंगाचे दिसू लागतात.
आदिल यांनी सांगितलं की, सामान्यपणे ही घटना जंगलात घडते. ज्यामुळे सापांना या अवस्थेत फारसं बघायला मिळत नाही. या काळात सापांना धुसर दिसतं. ज्यामुळे ते फार जास्त अग्रेसिव्ह होतात. एकदा कात निघून गेली की, त्यांचे डोळेही सामान्य होतात.
या रसल वायपरला जंगलात सोडून देण्यात आलं आहे. निळ्या डोळ्यांचा वायपर लोकांनी पहिल्यांदा बघितला. आणि हेही समजून घेतलं की, त्याचे डोळे निळे दिसले तर त्याच्याजवळ जाणं जीवघणं ठरू शकतं.