World most expensive diamond bag of 52 crore will save ocean | काय सांगता! ५२ कोटी रूपयांची आहे ही हॅंडबॅग, इतकी किंमत का? याचं कारण वाचून कराल कौतुक...

काय सांगता! ५२ कोटी रूपयांची आहे ही हॅंडबॅग, इतकी किंमत का? याचं कारण वाचून कराल कौतुक...

एका हॅंडबॅगची किंमत किती असेल चला काही हजार पकडू किंवा त्याहून अधिक काही लाख असल्याचं मानू. पण कधी तुम्ही एका हॅंडबॅगची किंमत कोट्यवधी असल्याचं तुम्ही ऐकलं नसेल. पण अशाच एका कोट्यवधी रूपयांच्या बॅगची सध्या चर्चा रंगली आहे. इटालियन लक्झरी ब्रॅन्ड Boarini Milanesi ने एका बॅग तयार केली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण या बॅगची किंमत ५२ कोटी रूपये ठेवण्यात आली आहे.

या फोटोत दिसणारी हीच ती बॅग आहे. या बॅगची किंमत आहे ६ मिलियन यूरो. भारतीय करन्सीनुसार ही किंमत ५२ कोटी रूपये इतकी होते. या बॅगची खासियत म्हणजे यात १० तोळं सोन्याची फुलपाखरे लावण्यात आली आहेत.  इतकेच नाही तर यात हिरे आणि अनेक महागडे दागिनेही लावून सजावट करण्यात आली आहे.

दरम्यान, या हॅंडबॅगच्या किंमतीतील ८० हजार यूरो समुद्राची साफ-सफाई करण्यासाठी दान केले जाणार आहेत. ब्रॅन्डचे को-फाउंडर Matteo Rodolfo Milanesi म्हणाले की, 'अलिकडे समुद्रात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बघतो आहे. या महामारी दरम्यान मास्क आणि गल्व्स सुद्धा बघायला मिळतात'. ते पुढे म्हणाले की ही बॅग तयार करण्यासाठी १ हजार तास लागले. लोक या ब्रॅन्डच्या चांगल्या कामाचं कौतुक करत आहेत. तर काहींनी यावर टीकाही केली आहे. 
 

Web Title: World most expensive diamond bag of 52 crore will save ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.