जगातील एक असं ठिकाण जिथे चुकूनही आढळत नाही मुंग्या, पाहा काय आहे याचं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 15:13 IST2025-12-18T15:11:14+5:302025-12-18T15:13:55+5:30
Interesting Facts : जगात मुंग्यांच्या सुमारे 12 हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. यापैकी बहुतेक मुंग्या काळ्या, तपकिरी आणि लाल रंगाच्या असतात.

जगातील एक असं ठिकाण जिथे चुकूनही आढळत नाही मुंग्या, पाहा काय आहे याचं नेमकं कारण
Interesting Facts : पृथ्वीवर जवळपास सगळ्याच ठिकाणी मुंग्या आढळतात. अशी फारच कमी ठिकाणं असतील जिथे मुंग्या दिसत नाहीत. जगात मुंग्यांच्या सुमारे 12 हजारांहून अधिक प्रजाती आढळतात. यापैकी बहुतेक मुंग्या काळ्या, तपकिरी आणि लाल रंगाच्या असतात. काही प्रजाती शांत स्वभावाच्या असतात, तर काही अतिशय धोकादायक मानल्या जातात.
आफ्रिकेत तर काही अशा मुंग्या आहेत की त्यांच्या चाव्यामुळे काही क्षणांतच माणसाचा मृत्यूही होऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का की जगात एक असं ठिकाण आहे, जिथे चुकून एकही मुंगी आढळत नाही? या ठिकाणाचं नाव आहे ग्रीनलँड. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठं बेट आहे. येथे गेल्यावर तुम्हाला एकही मुंगी दिसणार नाही.
मुंग्यांच्या वाढीसाठी आणि प्रजननासाठी हवामान आणि वातावरण महत्त्वाचे असते. मात्र ग्रीनलँडचे हवामान अत्यंत थंड असल्यामुळे येथे मुंग्यांसाठी योग्य परिसंस्था उपलब्ध नाही. शास्त्रज्ञांच्या मते, अतिशय थंड तापमान आणि हवामानाचा मुंग्यांवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळेच ग्रीनलँडमध्ये एकही मुंगी अस्तित्वात नाही.
ग्रीनलँड हे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ स्थित असल्यामुळे येथे वर्षभर तापमान खूप कमी असतं. अशीच परिस्थिती पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावरील अंटार्कटिका येथेही आहे. त्यामुळे अंटार्कटिकामध्येही मुंग्या आढळत नाहीत.
तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, केवळ थंड तापमान हेच कारण नाही, तर ग्रीनलँडमध्ये मुंग्यांसाठी योग्य फूड चेन देखील उपलब्ध नाही. अन्नसाखळी नसल्यामुळे मुंग्या येथे टिकून राहू शकत नाहीत.
ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट असून, ते अत्यंत सुंदर आहे. या बेटाचा मोठा भाग वर्षभर बर्फाने झाकलेला असतो. अनेक लोक पर्यटनासाठी ग्रीनलँडला भेट देतात. राजकीयदृष्ट्या ग्रीनलँडचा संबंध युरोपशी आहे, मात्र भौगोलिक दृष्ट्या ते उत्तर अमेरिकेचा एक भाग मानले जाते.