Video : भारतीयाचा विश्वविक्रम; ३७ किलोंचं जगातील सर्वात मोठं बॉलपेन, उचलण्यासाठी लागतात ५ जण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 12:47 PM2022-05-11T12:47:20+5:302022-05-11T15:19:17+5:30

तुम्ही कदाचित याची कल्पनाही केली नसेल. पाहा काय आहे या पेनमध्ये खास

world largest ball pen made in hyderabad weight 37 kg watch video know whats special in this | Video : भारतीयाचा विश्वविक्रम; ३७ किलोंचं जगातील सर्वात मोठं बॉलपेन, उचलण्यासाठी लागतात ५ जण!

Video : भारतीयाचा विश्वविक्रम; ३७ किलोंचं जगातील सर्वात मोठं बॉलपेन, उचलण्यासाठी लागतात ५ जण!

Next

जगातील सर्वांत मोठे बॉलपेन बनवण्याचा विश्वविक्रम एका भारतीय व्यक्तीने आपल्या नावे केला. पेन इतके मोठे आहे की, तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसेल. पेन ५.५ मीटर (१८ फूट, ०.५३ इंच) उंच आहे आणि याचे वजन तब्बल ३७.२३ किलो आहे. हे पेन सर्वसामान्यांच्या वापरासाठी नक्कीच नाही, हे कळले असेल. 

हैदराबादचे रहिवासी आचार्य माकुनुरी श्रीनिवास यांनी हे भलेमोठे पेन बनवले आहे. सोमवारी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्याची नोंद झाली. पेनासाठी ९ किलो पितळ वापरले आहे. १.४५ मीटरच्या फरकासह या पेनने आधीचा विश्वविक्रमही मोडीत काढला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने पेनचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 
पेन बनविणारे श्रीनिवास म्हणाले की, लहानपणी जेव्हा आई लिहिण्यासाठी पेन हातात द्यायची, त्यावेळी मोठे झाल्यावर मी एक अद्वितीय पेन डिझाइन करेन, अशी कल्पना करायचो. 

पेनने लिहिता येते, पण... 

  • इतक्या मोठ्या पेनने लिहिता येते का, अशा विचार तुमच्याही मनात आला असेल. तर, होय, या पेनने लिहिता येते. पण पेन हातात पकडण्यासाठी ५ ते ६ जणांची गरज लागते. 
  • ५ ते ६ जणांच्या मदतीने श्रीनिवास यांनी कागदावर एक प्रतीकात्मक चेहरा काढून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या टीमला दाखवले. 
  • पेनावर ९ प्रकारचे नृत्यप्रकार व भारतीय वाद्ये कोरली आहेत.

Read in English

Web Title: world largest ball pen made in hyderabad weight 37 kg watch video know whats special in this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.