पृथ्वीवरील एक वेगळंच आश्चर्य आहे हे ठिकाण, मसाल्यासारखी खाल्ली जाते येथील माती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 12:39 PM2021-10-25T12:39:42+5:302021-10-25T12:42:06+5:30

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, हे बेट आपल्या खनिज पदार्थांसाठी ओखळलं जातं. त्यामुळे याला वैज्ञानिक डिजनीलॅंड असंही म्हणतात.

Wonder of nature rainbow island the soil here is eaten like a spice and use an sauce | पृथ्वीवरील एक वेगळंच आश्चर्य आहे हे ठिकाण, मसाल्यासारखी खाल्ली जाते येथील माती

पृथ्वीवरील एक वेगळंच आश्चर्य आहे हे ठिकाण, मसाल्यासारखी खाल्ली जाते येथील माती

googlenewsNext

या जगात इतके रहस्य आहेत की, उलगडण्याचा प्रयत्न करण्यासाठी यादी बनवायला गेलं तर त्यासाठी काही जन्म घ्यावे लागतील. काही लोकांना आश्चर्य बघण्यासाठी आणि त्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. असाच एक अजूबा आहे इराणच्या हार्मोज द्वीपावर. हे फारच आकर्षक आहे आणि रेनबो बेटाच्या नावानेच ओळखलं जातं. पारसच्या खाडीमध्ये या रहस्यमय बेटाच्या डोंगराशिवाय सुंदर समुद्र किनारे वेगळंच सौंदर्य दाखवतात. पण त्यासोबतच आणखी एक बाब आहे ज्यामुळे हे बेट खास बनतं. असं म्हणतात की, येथील माती मसालेदार असते आणि लोक याचा वापर करतात.

बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, हे बेट आपल्या खनिज पदार्थांसाठी ओखळलं जातं. त्यामुळे याला वैज्ञानिक डिजनीलॅंड असंही म्हणतात. इथे जाणारे पर्यटक नेहमीच सल्ला देतात की, जेव्हाही तिथे जाण्याची संधी मिळेत तेव्हा तेथील मातीची चव नक्की घ्या. हे बेट फार रंगीबेरंगी आहे आणि इथे अनेक ठिकाणी मिठांच्या गंज्या दिसतात. ज्यांमध्ये शेल, माती आणि लोह यांचे थर दिसतात. या डोंगरांच्या थरांमुळे या भागात लाल, पिवळे आणि केशरी रंग चमकताना दिसत असतो.

या बेटावर ७० प्रकारचे खनिज आढळतात. लोकल गाइड्स सांगतात की, ४२ वर्ग किलोमीटर परिसरात प्रत्येक इंचाच्या जागेची आपली वेगळी एक कहाणी आहे. ब्रिटीश जिओलॉजिकल सर्व्हेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. कॅथरीन गुडइनफ ज्या आधी इराणसोबत काम करत होत्या, त्या म्हणाल्या की, कोट्यावधी वर्षाआधी फारसच्या खाडी आणि त्याच्या आजूबाजूच्या समुद्रात मिठांचा जाड थर तयार झाला होता. या थरांमध्ये हळूहळू आपसात टक्कर झाली आणि येथील खनिज असलेली ज्वालामुखीची राखही त्यात मिश्रित झाली. ज्यामुळे इथे रंगीत भूभाग तयार झाला. 

याआधी मिठांचे थर ज्वालामुखीच्या राखेमुळे झाकले गेले होते. नंतर काळानुसार मीठ फटांमध्ये बाहेर आलं आणि मिठांच्या गंज्या तयार झाल्या. गुडइनफ सांगतात की, मिठांचे जाड थर जमिनीखाली अनेक किलोमीटरपर्यंत घुसलेले होते आणि फारसच्या खाडीच्या मोठ्या भागात पसरले.
 

Web Title: Wonder of nature rainbow island the soil here is eaten like a spice and use an sauce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.