शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

महिलांना ५० वर्षांपूर्वीचंही लख्खं आठवतं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 12:37 IST

वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या नोकऱ्या आणि जॉब्जमध्ये त्यामुळेच महिलांचं प्रमाण आता वाढू लागलं आहे.

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये काम करण्याची क्षमता जास्त असते. त्या अधिक जबाबदारीने काम करतात, त्यातला अचूकपणाही अधिक असतो, याशिवाय त्यांच्यात अष्टपैलूत्व अधिक असतं, एकाच वेळी एकापेक्षा अधिक कामं त्या अतिशय सहजपणे करू शकतात, याबाबतीत कोणाच्याही मनात संदेह नसावा. कारण घराघरातलं हे वास्तव आपण रोजच बघत असतो. ज्या महिला नोकरी करतात, त्यांच्यातलं अष्टपैलूत्व तर आणखी जास्तच असतं. कारण एकाच वेळी त्या घर सांभाळत असतात, मुलांची जबाबदारी निभावत असतात, आर्थिक हातभार उचलत असतात, पै-पाहुणे, नातेवाईक, आले-गेले, या साऱ्यांचं हसतमुखानं करीत असतात... पण यावरच ही यादी संपत नाही.

पुरुषांपेक्षा महिलांची स्मरणशक्तीही अधिक असते आणि गरजेच्या वेळी त्या या स्मरणशक्तीचा उपयोग करू शकतात, असं एक महत्त्वाचं संशोधन नुकतंच शास्त्रज्ञांनी केलं आहे. नॉर्वे येथील बर्गन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एका अतिशय व्यापक संशोधनातून हे सत्य उजेडात आणलं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या वयोगटांतील तब्बल साडेतीन लाख महिला आणि पुरुषांचा डेटा त्यांनी गोळा केला. त्याचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यातून त्यांनी निष्कर्ष काढला की, महिलांची स्मरणशक्ती पुरुषांपेक्षा जास्त असते. तब्बल ५० वर्षांपर्वी ऐकलेले, पाहिलेले, वाचलेले शब्दही महिला पुन्हा आठवू शकतात, असं हा अभ्यास सांगतो.

महिलांची स्मृती पुरुषांपेक्षा जास्त असते, असा यापूर्वी केवळ अंदाज बांधला जात होता, पण त्यांची स्मृतिक्षमता खरंच जास्त असते का, किती जास्त असते, या संदर्भातला ठोस असा अभ्यास आतापर्यंत झाला नव्हता. या अभ्यासाने या समजाला नुसती बळकटीच आलेली नाही, तर हा अभ्यास म्हणजे महिलांच्या क्षमतेबाबतच्या पुराव्यांसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे.

या संदर्भाचा अभ्यास करणारे सहलेखक मॅक्रो हिर्नस्टीन यांचं म्हणणं आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला अनेक बाबतीत सरस आहेत, हे तर उघडच आहे, त्यात आता स्मृतीच्या बाबतीतही त्यांनी पुरुषांवर बाजी मारली आहे. महिलांची स्मृती पुरुषांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात अधिक नसली, तरीही काही वेळा हा छोटा फरकही अतिशय महत्त्वाचा ठरतो आणि त्यांच्यातलं श्रेष्ठत्व अधोरेखित करतो.

संशोधनातली आणखी काही ठळक बाबी म्हणजे,महिला पुरुषांपेक्षा अधिक अस्खलित, प्रवाही बोलू शकतात. त्यांच्या बोलण्यात सुसंगतपणा अधिक असतो. याबाबतीत महिलांचा आत्मविश्वासही पुरुषांपेक्षा अधिक असतो. त्यामुळे संभाषण करताना, आपला एखादा मुद्दा पटवून देताना, दुसऱ्याचा मुद्दा खोडून काढताना, आपणच कसे बरोबर आहोत, हे ठासून सांगताना, त्या पुरुषांपेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतात. अर्थात, यावर अनेक घटक परिणाम होऊ शकतो. अवलंबून असले, तरीही सर्वसामान्यपणे याबाबतीत महिला पुरुषांपेक्षा सरस ठरतात.

वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या नोकऱ्या आणि जॉब्जमध्ये त्यामुळेच महिलांचं प्रमाण आता वाढू लागलं आहे. कारण त्यांची बोलण्याची, इतरांना पटवून देण्याची क्षमता आणि चिकाटी चांगली असल्यानं अनेक कंपन्यांचं महिला कर्मचाऱ्यांकडे लक्ष जाऊ लागलं आहे. तरीही महिलांवर असलेला सामाजिक, कौटुंबिक दबाब, त्यांच्यावर असलेल्या इतर अनेक जबाबदाऱ्या, मुलांचं पालनपोषण, लग्नानंतर आणि मूल झाल्यानंतर अनेकदा नोकरी सोडण्यासाठी त्यांच्यावर येणार दबाव... यासारथी इतर काही कारणं आहेत, ज्यामुळे जॉब मार्केटमध्ये महिलांची दावेदारी कमी होते.

महिलांची स्मृती तर तल्लख असतेच, पण विशिष्ट अक्षर किंवा श्रेणीपासून सुरू होणारी नावं, शब्द शोधण्यात आणि ते लक्षात ठेवण्यातही महिलांची मातब्बरी मोठी आहे. मार्को हिर्नस्टीन यांचं म्हणणं आहे. बौद्धिक कुशलतेत महिला आणि पुरुषांच्या क्षमतेत फारसा फरक नाही, दोघांचीही क्षमता सारखीच आहे, पण महिलांच्या मेंदूतील कोर्टेक्स आणि लिम्बिक सीस्टिममध्ये रक्ताचा पुरवठा तुलनेनं जास्त होतो, त्यामुळे महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा अधिक क्रियाशील होतो.

मुश्कील है भुलना तुम्हारा चेहरा!महिला आणि पुरुषांच्या स्मृतिसंदर्भात स्वीडनच्या करोलिस्का युनिव्हर्सिटीमध्येही नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. तेथील शास्त्रज्ञांच्या मते कोणाही व्यक्तीचा चेहरा लक्षात ठेवण्यात महिला पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असतात. एकदा पाहिलेला चेहरा नुसता त्यांच्या लक्षातच राहत नाही, तर बराच काळ त्या लक्षात ठेऊ शकतात आणि त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर लगेच त्यांच्या जुन्या स्मृतीही ताज्या होतात. इतकंच नाही. गंध वास यांसारख्या संवेदी आठवणीही महिला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतात. झोपेचा अभाव, नैराश्य किंवा वृद्धत्व, यामुळे मात्र त्यांच्या या स्मृतीवर परिणाम होऊ शकतो.

टॅग्स :Womenमहिला