शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

आधार कार्डची पूजा केल्यावर पंतप्रधान मोदी पैसे पाठवतात; गावात अफवा पसरली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 7:21 PM

सूर्याची पूजा केल्यावर कोरोनाचा खात्मा होत असल्याची गावात अफवा

गढवा: देशातील कोरोना रुग्णांच्या सातत्यानं वाढ होत आहे. कोरोनाची दहशत अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. झारखंडच्या गढवामध्ये कोरोनाशी संबंधित एक अजब अफवा पसरली आहे. सूर्याची उपासना केल्यावर कोरोना विषाणूचा खात्मा होतो, अशी अफवा गावात पसरली आहे. ही एक अफवा कमी म्हणून की काय कलशावर आधार कार्ड ठेवून पूजा केल्यास मोदी सरकार बँक खात्यात पैसे पाठवतं, अशी आणखी एक दुसरी अफवा पसरली. यानंतर मेराल आणि मझीगावमधल्या महिला नदी किनारी जमल्या. त्यांनी कलशावर आधार कार्ड ठेवून सूर्याची पूजा सुरू केली. युरिया नदीच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन महिला कोरोना विषाणूचा खात्मा करण्यासाठी सूर्याची पूजा करत आहेत. याशिवाय गंगा मातेची आराधना करून कोरोना विषाणू वाहून न्यावा, अशी विनंती महिलांकडून करण्यात येत आहे. आधार कार्डची पूजा केल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्या खात्यात पैसे पाठवतील, अशी चर्चा गावात असल्याचं महिलांनी सांगितलं. त्यामुळेच आपण पूजा करत असल्याचं त्या म्हणाल्या. कोरोना संकट दूर करण्यासाठी सध्या महिला सूर्याची पूजा करत आहेत. पंतप्रधान मोदींनी बँक खात्यात पैसे जमा करावेत, यासाठी आधार कार्डची पूजा सुरू आहे. याबद्दल हासनदाग ग्रामपंचायतीचे सरपंच दुखन चौधरींकडे विचारणा केली असता, कोणीतरी गावात याबद्दल अफवा पसरवल्याचं त्यांनी सांगितलं. सूर्याची पूजा केल्यानं कोरोनाचा खात्मा होत नाही, आधार कार्डचं पूजन केल्यानं खात्यात पैसे येत नाहीत, अशा शब्दांत गावातल्या काही सुशिक्षितांनी महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महिला कोणाचंही ऐकायला तयार नाहीत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAdhar Cardआधार कार्डcorona virusकोरोना वायरस बातम्या