त्याने प्रेयसीचा 'तो' व्हिडीओ आणि तिच्या घराचा पत्ता पॉर्न वेबसाइटवर केला शेअर आणि.....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 14:20 IST2020-02-22T14:16:54+5:302020-02-22T14:20:16+5:30

प्रियकराने त्यांच्या बेडरूममध्ये एका कॅमेरा लावला होता. पण या कॅमेराबाबत महिलेला काहीच माहीत नव्हते.

Women discovered partner used spy cameras film naked uploaded videos porn sites | त्याने प्रेयसीचा 'तो' व्हिडीओ आणि तिच्या घराचा पत्ता पॉर्न वेबसाइटवर केला शेअर आणि.....

त्याने प्रेयसीचा 'तो' व्हिडीओ आणि तिच्या घराचा पत्ता पॉर्न वेबसाइटवर केला शेअर आणि.....

इंग्लंडच्या बर्मिंगहॅम येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका महिलेचा प्रियकर तिचे खाजगी क्षणांचे व्हिडीओ शूट करत होता असा खुलासा केला आहे. इतकेच नाही तर त्याने ते व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवरही टाकले आणि सोबतच तिचा पत्तीही टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हिडीओसोबत पत्ताही टाकल्याने या महिलेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, झालं असं की, प्रियकराने त्यांच्या बेडरूममध्ये एका कॅमेरा लावला होता. पण या कॅमेराबाबत महिलेला काहीच माहीत नव्हते. याच कॅमेरात दोघांचेही खाजगी क्षण रेकॉर्ड करण्यात आले. त्याने नंतर हे व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर टाकले आणि सोबतच तिचा पत्ताही दिला. यानंतर महिलेला फारच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे तिने पोलिसात तक्रार दिली. 

(Image Credit : DailyMail)

शेरॉन थॉम्पसन असं या ४० वर्षीय महिलेचं नाव असून ती तीन मुलांची आई आहे. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाल्याने ती एकटी राहत होती. नंतर ती डॅरेन नावाच्या तरुणासोबत दोन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहू लागली. एक दिवस अचानक घरी अनेक पुरूष येऊ लागले आणि तिला तिच्या प्रियकराने केलेल्या कारनाम्याची माहिती मिळाली.

(Image Credit : DailyMail)

तिने सांगितले की, एका दिवसात एकापाठोपाठ १२ लोक घरी आले होते. एकाएकी इतके पुरूष येऊ लागल्याने ती खूप घाबरली होती. पण जरा हिंमत करून तिने एका व्यक्तीला तो इथे का आला याचं कारण विचारलं. तेव्हा या गोष्टीचा खुलासा झाला की, व्हिडीओसोबत त्याने पत्ताही साइटवर टाकलाय. 

शेरॉनच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. इंग्लंडच्या वॉल्व्हरहॅम्प्टन येथील कोर्टाने एक्स बॉयफ्रेंडला दोषी ठरवत त्याला दोन वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.


Web Title: Women discovered partner used spy cameras film naked uploaded videos porn sites