फोनवर सारखे येत होते अनोळखी नंबरवरून कॉल्स, रागावून उचलला फोन अन् मिळाले ११ कोटी रूपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 18:28 IST2021-08-03T18:00:34+5:302021-08-03T18:28:44+5:30
अनोखळी क्रमांकावरील कॉल्सपासून आपण लांबच राहणे पसंत करतो. मात्र, ऑस्ट्रेलियातील महिलेसोबत एक असा किस्सा घडला की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.

फोनवर सारखे येत होते अनोळखी नंबरवरून कॉल्स, रागावून उचलला फोन अन् मिळाले ११ कोटी रूपये
अनोळखी (unknown) नंबर वरून कॉल आला की ते आपण उचलत नाही. कारण अनेकदा ते कॉल्स स्कॅमर्सचे असण्याची शक्यता असते. काहीवेळा काही प्रोडक्ट्ससाठीही काहीजण फोन करून त्रास देतात. त्यामुळे अनोखळी क्रमांकावरील कॉल्सपासून आपण लांबच राहणे पसंत करतो. मात्र, ऑस्ट्रेलियातील महिलेसोबत एक असा किस्सा घडला की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
युपीआय न्युजमध्ये दिलेल्या बातमीनुसार ऑस्ट्रिलियातील एका महिलेला वारंवार अनोळखी नंबरवरून कॉल येत होते. तिला देखील असे वाटले की हे कॉल्स स्कॅमर्सचे असतील म्हणून तिने सुरुवातीला ते उचलले नाहीत. पण जेव्हा सारखे कॉल येऊ लागले तेव्हा कोण फोन करतंय हे पाहण्यासाठी तिने कॉल उचलला. अहो आणि पुढे जे झाले ते वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. त्या महिलेला १.५ डॉलरची म्हणजे ११ करोडची लॉटरी लागली होती. हे कोणतेही स्कॅम नव्हते तर या महिलेने वेस्टबरी फेस्टिव्हलमध्ये लॉटो आऊटलेटवरून लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. तीच लॉटरी तिला लागली होती.
ऑस्ट्रेलियातील तास्मानियामध्ये राहणाऱ्या या महिलेने सांगितले की, "मी अनोळखी नंबवरून आलेले फोन उचलत नाही. मला वाटत ते फसवणूक करण्यासाठी केलेलेच कॉल असतात. काही माणसं मुद्दामुन त्रास देण्याच्या उद्देशानेही काहीवेळा फोन करतात. पण मला इतक्यांदा फोन आला की मी विचार केला की फोन उचलून कॉल करण्यामागचं काय कारणं आहे हे जाणून घ्याव."या महिलेने ३१ जुलै रोजी ही टैटस्लोटो ड्रॉईंग लॉटो लॉटरी जिंकली.