महिलेने कचऱ्यात फेकले होते ७६ लाख रूपये, पती पाहिलं नसतं तर झालं असतं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 17:25 IST2022-05-03T17:24:55+5:302022-05-03T17:25:19+5:30
महिलेने ५ डॉलर रूपयाचं एक गोल्डन एडिशन लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं. यूपीआयच्या रिपोर्टनुसार, निराश महिलेने एक दिवस तिकीट कचऱ्यात फेकलं.

महिलेने कचऱ्यात फेकले होते ७६ लाख रूपये, पती पाहिलं नसतं तर झालं असतं नुकसान
Woman Won Lottery : अनेकदा आपलं उज्वल भविष्य आपल्या समोरच असतं, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. असंच काहीसं ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या महिलेसोबत झालं. तिने लाखो रूपये तिच्या हाताने फेकून दिले होते. सुदैवाने महिलेच्या पतीने गोल्डन तिकीट पाहिलं आणि त्यांच्या घरात ७५ लाख रूपये आले.
महिलेने ५ डॉलर रूपयाचं एक गोल्डन एडिशन लॉटरी तिकीट खरेदी केलं होतं. यूपीआयच्या रिपोर्टनुसार, निराश महिलेने एक दिवस तिकीट कचऱ्यात फेकलं. तिला जराही अंदाज नव्हता की, हे तिकीट तिचं नशीब बदलणार आहे. सुदैवाने महिलेच्या पतीने ते तिकीट उचलून आपल्या जवळ ठेवलं.
महिलेने लॉटरी ऑफिशियल्सला सांगितलं की, तिने जेव्हा पहिल्यांदा तिकीट स्क्रॅच केलं तेव्हा तिला वाटलं की, त्यात काही नाही आणि तिने तिकीट कचऱ्यात फेकलं. तेव्हाच तिच्या पतीने तिकीट उचलून ते पुन्हा पाहिलं. तेव्हा त्याला समजलं की, त्याला लॉटरी लागली आहे. तेही १ लाख डॉलरची. बघता बघता त्याचं नशीब पालटलं आणि महिलेला घरबसल्या ७५ लाख रूपयांची मोठी रक्कम मिळाली.
महिलेने सांगितलं की, ती दर आठवड्याला स्क्रॅच ऑफ लॉटरी तिकीट खरेदी करत होती. अनेक वर्ष असं करूनही तिच्या हाती काहीच लागलं नाही. महिलेने सांगितलं की, लॉटरीतून मिळालेल्या पैशातून ती तिच्यासाठी नवीन कार विकत घेणार आणि बाकीच्या पैशातून मुलांची मदत करणार.