पत्नीला बेडरुममध्ये 'या' स्थितीत पाहून हादरला पती, पत्नी रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 13:43 IST2019-01-01T13:42:40+5:302019-01-01T13:43:35+5:30

जगभरात अशा काही घटना घडत असतात की, ज्या वाचून किंवा पाहून आपण डोक्याला हात मारुन घेतो. असीच एक घटना ऑस्ट्रेलियात समोर आली आहे.

Woman wears stockings looking like snake, husband understood two snakes and beats her | पत्नीला बेडरुममध्ये 'या' स्थितीत पाहून हादरला पती, पत्नी रुग्णालयात दाखल

पत्नीला बेडरुममध्ये 'या' स्थितीत पाहून हादरला पती, पत्नी रुग्णालयात दाखल

जगभरात अशा काही घटना घडत असतात की, ज्या वाचून किंवा पाहून आपण डोक्याला हात मारुन घेतो. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात समोर आली आहे. इथे पतीने पत्नीला बेडवर विचित्र स्थितीत पाहिलं आणि त्याचा पारा चढला. त्यानंतर त्याने पत्नीला इतकी मारहाण केली की, तिला रुग्णालायत दाखल करावं लागलं. खरंतर पत्नीने केलेल्या मस्करीची कुस्करी झाली असंच म्हणावं लागेल. 

फॅशनच्या नावाखाली लोक असं काही करु लागले आहे की, बोलायलाच नको. कसेही कपडे परिधान करुन त्याला फॅशनचं नाव दिलं जातं आहे. पण काहींना ही फॅशन अशाप्रकारे महागातही पडत आहे. झालं असं की, येथील एका महिलेने सापासारखे दिसणारे स्टॉकिंग्स(लांब मोजे) घालून ती बेडवर झोपली होती. अशातच रुममध्ये तिला पती आला.  

पती रुममध्ये येताच त्याला वाटलं की, बेडवर दोन साप आहेत. हे पाहताच त्याने बेसबॅटने त्यांना मारण्यास सुरुवात केली. तो इतका घाबरला होता की त्याच्या हे लक्षात नाही आलं की, ते त्याच्या पत्नीचे पाय आहेत. यात त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं.  

या फोटोंमधून हे स्पष्ट दिसतं की, या महिलेच्या पायातील मोजे सापासारखेच दिसत आहेत. आता अशावेळी असं चित्र पाहिल्यावर कोणता व्यक्ती घाबरणार नाही? पण यातून हेच समोर येतं की, फॅशन करतानाही जरा सांभाळून करा नाही तर तुम्हालाच ते महागात पडू शकतं. 

Web Title: Woman wears stockings looking like snake, husband understood two snakes and beats her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.