...म्हणून मी पतीला कुत्र्याप्रमाणे वागवते, साखळी बांधून फिरवते; पत्नीनं सांगितलं अजब कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 12:07 IST2021-11-08T12:05:13+5:302021-11-08T12:07:41+5:30
नवऱ्याला कुत्र्याप्रमाणे वागवणाऱ्या महिलेचं स्पष्टीकरण; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

...म्हणून मी पतीला कुत्र्याप्रमाणे वागवते, साखळी बांधून फिरवते; पत्नीनं सांगितलं अजब कारण
रिओ दि जनेरो: ब्राझीलमध्ये एक महिला तिच्या पतीला कुत्र्याप्रमाणे वागवताना दिसत आहे. या महिलेचे आणि तिच्या पतीचे फोटो पाहून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. महिलेनं पतीला साखळीनं बांधलं आहे. या कृतीमुळे महिलेला अनेकांनी ट्रोल केलं. तिच्या वर्तणुकीवर कित्येकांनी टीका केली आहे.
डेली स्टारनं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेचं नाव लुआना कझाकी असून तिच्या पतीचं नाव आर्थर ओऊर्सो आहे. दोघेही ब्राझीलमधील एका गर्दीच्या रेल्वे स्थानकावर फोटो काढताना दिसले. लुआना तिचा पती आर्थरला कुत्र्याप्रमाणे वागवत असल्याचं फोटोत दिसत आहे. आर्थरच्या गळ्यात लोखंडी साखळी आहे. ती लुआनानं तिच्या हातात धरली आहे. हीच साखळी धरून लुआना आर्थरला फिरवत आहे. आर्थरच्या चेहऱ्यावर एक मुखवटा आहे.
दोघांमध्ये असलेलं प्रेम आणि रोमॅन्स वाढवण्यासाठी ही कृती केल्याचं लुआनानं सांगितलं. 'लोक काय म्हणतात, ते काय विचार करतात, यामुळे मला फरक पडत नाही. मी कोणतंही बेकायदेशीर कृत्य करत नाही. यामुळे आम्हा दोघांमधलं प्रेम आणि कामेच्छा वाढत आहे, अशी आमची भावना आहे,' असं लुआना म्हणाली.