शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महिलेने फुकटात भरून घेतलं 22 लाख रूपयांचं पेट्रोल, तिचा कारनामा वाचाल तर व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 11:44 IST

एका महिलेने पॉइंट्सचा वापर करून मोफत चक्क 22 लाख रूपयांचं पेट्रोल भरून घेतलं. तिने अशी आयडिया केली की, तुम्हीही वाचून हैराण व्हाल.

पेट्रोल भरण्यासाठी पंपावर गेल्यावर तुम्ही कधी कॅश देत असाल, तर कधी फोनपे किंवा पेटीएम करत असाल किंवा क्रेडिट कार्डचा वापर करत असाल. यावर काही रिवार्ड्स पॉइंट्स मिळतात. जे पुढच्या वेळी कामात येतात. पण एका महिलेने तर याच पॉइंट्सचा वापर करून मोफत चक्क 22 लाख रूपयांचं पेट्रोल भरून घेतलं. तिने अशी आयडिया केली की, तुम्हीही वाचून हैराण व्हाल.

मेट्रोच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारी 45 वर्षीय डॉन थॉम्पसन रोज नेब्रास्काच्या एका पंपावरून पेट्रोल भरत होती. यासाठी रिवार्ड कार्डचा वापर करत होती. तिच्या पॉइंट्सने ती बिल देत होती. तिला एकही पैसा द्यावा लागत नव्ता. पण एका गडबडीमुळे तिने लाखो रूपये वाचवले होते. झालं असं की, 2022 मध्ये पेट्रोल पंपाने आपलं सॉफ्टवेअर अपडेट केलं. त्यानंतर त्यात बिघाड झाला.

यामुळे झालं असं की, याने लॉयल्टी कार्ड असलेल्या ग्राहकाना संधी मिळाली. कारण जर तुम्ही या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दोनदा कार्ड स्‍वाइप केल तर पेट्रोल पंपचं सॉफ्टवेअर डेमो मोडवर जात होतं. म्हणजे सगळंकाही डेमोच्या माध्यमातून होत होतं. म्हणजे यासाठी काही पैसे द्यावे लागत नव्हते. या महिलेने जेव्हा हे पहिल्यांदा पाहिलं तर पुन्हा पुन्हा ती असंच करत होती. तिचा एक रूपयाची कट झाला नाही. असं करत करत महिलेने एका वर्षात 510 वेळा पेट्रोल भरलं. कधी कधी तर ती दिवसातून अनेकदा पेट्रोल भरायला येत होती.

कसा झाला खुलासा?

एक वर्षाने जेव्हा पेट्रोल पंपच्या लोकांनी हिशेब केला तेव्हा त्यांना बिघाडाचा संशय आला. त्यांची चौकशी केली तेव्हा समजलं की, महिलेने 27 हजार डॉलर म्हणजे साधारण 22 लाख रूपयांचं पेट्रोल मोफत भरलं. त्यांनी लगेच पोलिसांना संपर्क केला.

सीसीटीव्ही कॅमेरात थॉम्पसन अनेकदा पंपावर पेट्रोल भरताना दिसली. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने 13 नोव्हेंबर 2022 ते 1 जून 2023 दरम्यान रिवॉर्ड कार्डचा वापर करून 510 वेळा पेट्रोल भरलं. पोलिसांना कार्डचा वापर करणाऱ्या आणखी एका महिलेची माहिती मिळाली. चौकशी केली तर महिलेने सांगितलं की, तिला याबाबत माहीत नव्हतं. ती पूर्ण पैसे भरण्यास तयार आहे. सध्या ही केस कोर्टात सुरू आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिका