VIDEO: महिलेने एक्स बॉयफ्रेन्डवर असा उगवला सूड, गिफ्ट दिलेल्या बाइकला लावली आग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 15:36 IST2021-06-28T15:29:38+5:302021-06-28T15:36:46+5:30
मीडिया रिपोर्टनुसार, कथितपणे कनोकला तिच्या एक्स बॉयफ्रेन्डवर सू़ड उगवायचा होता. कारण तो तिला सोडून गेला होता आणि परत येण्यास त्याने नकार दिला होता.

VIDEO: महिलेने एक्स बॉयफ्रेन्डवर असा उगवला सूड, गिफ्ट दिलेल्या बाइकला लावली आग...
एका महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डवर सूड उगवण्यासाठी असं काही केलं जे पाहून सगळेच हैराण झाले. महिलेने सूड उगवण्यासाठी एक्स बॉयफ्रेन्डच्या बाइकला आग लावली. महिलेचं हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना थायलॅंडमधील असून ३६ वर्षीय कनोक वानने बॅंकॉकच्या एका स्कूल पार्किंगमध्ये उभी असलेली एक्सची बाइक पेट्रोल टाकून पेटवली.
मीडिया रिपोर्टनुसार, कथितपणे कनोकला तिच्या एक्स बॉयफ्रेन्डवर सू़ड उगवायचा होता. कारण तो तिला सोडून गेला होता आणि परत येण्यास त्याने नकार दिला होता. सुदैवाने या घटनेत कुणाला काही झालं नाही. मात्र, आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाची गाडी तिथे पोहोचेपर्यत इतरही काही गाड्या आगीच्या कचाट्यात सापडल्या. (हे पण वाचा : गर्लफ्रेन्डच्या रूममध्ये बॉयफ्रेन्डला दिसलं असं काही, त्यानेच झाला तिचा भांडाफोड!)
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'आम्हाला शाळेच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली होती. ही आग तिसऱ्या मजल्यावर लागली होती. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. कारण कोरोना महामारीमुळे मुलांचे क्लासेस ऑनलाइनच सुरू आहेत. (हे पण वाचा : हेच होणार ना! आपल्याच लग्नात नवरदेवाने केलं असं काही, नवरीने थेट लग्न करण्यास दिला नकार)
अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी १० मिनिटात आग आटोक्यात आणली आणि आग पसरणं रोखलं. जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले तेव्हा त्यांना एक महिला दिसली. ही महिला शाळेतील एका कर्मचाऱ्याची एक्स असल्याचं समजलं. या महिलेला बुधवारी अटक करण्यात आली.
पोलिसांनुसार, महिलेने तिच्या एक्स बॉयफ्रेन्डला साधारण २३ लाख रूपये किंमतीची बाइक गिफ्ट केली होती. त्यावेळी दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. पोलिसांनुसार, महिलेला त्याची बाइक जाळून त्याच्यावर सूड उगवायचा होता. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.