तिच्या शवाखाली मुलीचे शव आणि बाजूला मृत मांजर, महिलेनं ब्लॅक मॅजिकच्या वेडापायी दिला मुलीचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 05:39 PM2021-09-16T17:39:20+5:302021-09-16T17:45:55+5:30

घटनास्थळी महिलेचे शव तिच्या मुलीच्या शवावरती होते तर बाजूला तिच्या पाळीव मांजरीचे शव होते आणि आजूबाजूला तिच्या प्रियकराचे फोटो पसरलेले होते.घटनास्थळी महिलेचे शव तिच्या मुलीच्या शवावरती होते तर बाजूला तिच्या पाळीव मांजरीचे शव होते आणि आजूबाजूला तिच्या प्रियकराचे फोटो पसरलेले होते.

woman in Russia practicing black magic found dead in home with her daughters and cats dead body | तिच्या शवाखाली मुलीचे शव आणि बाजूला मृत मांजर, महिलेनं ब्लॅक मॅजिकच्या वेडापायी दिला मुलीचा बळी

तिच्या शवाखाली मुलीचे शव आणि बाजूला मृत मांजर, महिलेनं ब्लॅक मॅजिकच्या वेडापायी दिला मुलीचा बळी

Next

एका मर्डर मिस्ट्रीने पोलिसांची झोप उडवलीय. यात जादुटोणा झाल्याचा संशय असुन घटनास्थळी विचित्र प्रकार पाहायला मिळाला. घटनास्थळी महिलेचे शव तिच्या मुलीच्या शवावरती होते तर बाजूला तिच्या पाळीव मांजरीचे शव होते आणि आजूबाजूला तिच्या प्रियकराचे फोटो पसरलेले होते.

अंधश्रद्धा, जादुटोणा, भानामती फक्त भारतातच नाहीत तर इतरही देशांमध्ये आहेत. रशियामध्ये ब्लॅक मॅजिक (black magic) काळ्या जादूचा एक भयानक प्रकार समोर आला आहे. या ब्लॅक मॅजिकच्या वेडापायी या महिलेनं स्वत:च्या मुलीचा आणि पाळीव मांजाराचाही जीव घेतला. 

एलिझावेटा (Elizaveta Tsarevskaya)असं या महिलेचं नाव आहे. ती पेशानं आर्किटेक्चर होती. आपली चांगली नोकरी सोडुन ती ब्लॅक मॅजिक शिकण्याच्या मागे लागलेली. दिवसभर ती या जादूचा अभ्यास करायची. तिच्या पतीनं सांगितलं की, एलिझावेटा एक उत्तम आर्किटेक होती. त्यासोबतच ती चांगली फॅशन डिझायनरही होती. पण आपली नोकरी सोडुन ती आत्म्यांशी बोलण्याची विद्या शिकत होती. यात तिचे एका तरुणावर प्रेमही जडले होते. जो स्वत:ला या काळ्या जादूतील तज्ज्ञ म्हणवून घ्यायचा.

ज्यादिवशी तिचा अन् तिच्या मुलीचा मृत्यू झाला तेव्हा पोलीस तिच्या घरी पोहोचले. त्यावेळी तिचा पती घरी नव्हता. दरवाजा उघडताच समोरचे दृश्य पाहुन त्यांचा डोळ्यावरचा विश्वासच उडाला. समोर तिचे निर्वस्त्र शव व तिच्या खाली तिच्या मुलीचे शव होते. बाजूला मेलेल्या माजंरीचा मृतदेह होता. ती मांजर तिचीच पाळीव मांजर होती. तिच्या आजुबाजुला तिच्या प्रियकराचे फोटो इकडेतिकडे पडलेले होते.

Web Title: woman in Russia practicing black magic found dead in home with her daughters and cats dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app