शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

काय सांगता! योग्य व्यक्तीच्या शोधात महिलेने १० वेळा केली लग्ने, म्हणाली - भेटला नाही मिस्टर परफेक्ट...

By अमित इंगोले | Published: October 30, 2020 2:55 PM

अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचं नाव आहे Cassey. या महिलेने एकापाठी एक १० लग्ने केली. तिचं सर्वात जास्त टिकलेलं लग्न ८ वर्षे होतं.

ते म्हणतात ना जीवनात एखादा माणूस यावा तर योग्य यावा नाही तर येऊ नये. एका महिलेने याचं बेस्ट उदाहरण दिलं आहे. या महिलेने १० वेळा लग्न केलं. पण तिला आजपर्यंत परफेक्ट मॅच मिळाला नाही. सध्या या महिलेची चर्चा रंगली आहे. सामान्यपणे आपल्याकडे परफेक्ट मॅचच्या शोधात मुलं-मुली उशीरा लग्न करतात. पण या महिलेला तर १० लग्ने करूनही मिस्टर परफेक्ट मिळाला नाही. 

अमेरिकेत राहणाऱ्या या महिलेचं नाव आहे Cassey. या महिलेने एकापाठी एक १० लग्ने केली. तिचं सर्वात जास्त टिकलेलं लग्न ८ वर्षे होतं. तर तिचं सर्वात कमी काळ टिकलेलं लग्न ६ महिनेच होतं. सध्या ती लवकरच तिच्या १० व्या रिलेशनशिप मधूनही बाहेर पडणार आहे. ५६ वर्षीय Cassey ही एका चॅट शोचा भाग झाली होती. ज्यात ती रिलेशनशिपबाबत सल्ला देत होती. 

यावेळी एका व्यक्तीने या महिलेला विचारले की, जेव्हा तुम्ही सांगता की, तुम्ही १० लग्ने केली आहेत. तर त्यात एक गर्वही असतो. पण कधी तुम्हाला या गोष्टीवर हसू आलं का? यावर Cassey ने उत्तर दिलं की, कधी  कधी तर अशी वेळ येते की, मला हसू आणि रडू दोन्ही येतं.

या महिलेने सांगितले की,  जेव्हा मी लग्नाचं आयुष्य जगत असते तेव्हा मला वाटतं की आता बस आणखी नाही होऊ शकणार. तेव्हा मी बोलते की, चला आपण घटस्फोट घेऊ. तिने सांगितले की, 'मला काहीच फरक पडत नाही की, मी किती लग्ने करते. पण जोपर्यंत मला प्रेम करणारी व्यक्ती भेटत नाही तोपर्यंत मी हे करत राहणार'. 

दरम्यान, तशी तर अमेरिकेसारख्या देशात या फार कॉमन गोष्टी आहेत. पण एका परफेक्ट मॅचपर्यंत पोहोचण्याचा अधिकार तर सर्वांनाच असला पाहिजे. योग्य व्यक्तीलाच जीवनात जागा दिली गेली पाहिजे. याबाबतीत अजिबात क्रॉम्प्रमाइज करू नये. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय