'फुकटात' जगत होती श्रीमंतांसारखी लाइफस्टाईल, मग जमा केली कोट्यावधीची संपत्ती; आता देते इतरांना ट्रेनिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 18:48 IST2022-01-13T18:46:49+5:302022-01-13T18:48:33+5:30

Sugar Baby : आश्चर्याची बाब म्हणजे यातलं काहीच डॅश प्रीस्टलीने तिच्या कमाईतून खरेदी केलेलं नाही. हे सगळं तिला 'फुकटात' किंवा असं म्हणूया की, गिफ्ट मिळालं आहे. तेही अनोळखी लोकांकडून. 

Woman living rich lifestyle in free sugar daddy porsche car diamond jewelry, now giving tips to other girls | 'फुकटात' जगत होती श्रीमंतांसारखी लाइफस्टाईल, मग जमा केली कोट्यावधीची संपत्ती; आता देते इतरांना ट्रेनिंग

'फुकटात' जगत होती श्रीमंतांसारखी लाइफस्टाईल, मग जमा केली कोट्यावधीची संपत्ती; आता देते इतरांना ट्रेनिंग

अमेरिकेच्या अटलांटामध्ये राहणारी २५ वर्षीय डॅश प्रीस्टलीची लाइफस्टाईल श्रीमंतांसारखी आहे ती पॉर्शेसारखी लक्झरी कार चालवते. तिच्या घरातील कपाट डिझायनर कपड्यांनी आणि बॅग्सनी भरलेलं आहे. तिच्याकडे डायमंडचे अनेक दागिने आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे यातलं काहीच डॅश प्रीस्टलीने तिच्या कमाईतून खरेदी केलेलं नाही. हे सगळं तिला 'फुकटात' किंवा असं म्हणूया की, गिफ्ट मिळालं आहे. तेही अनोळखी लोकांकडून. 

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार प्रीस्टली आधी तर आपल्यासाठी एका शुगर डॅडीचा शोध घ्यायची आणि मग त्याच्यासोब वेळ घालवायची. त्या बदल्यात ते प्रीस्टलीला लक्झरी लाइफस्टाईल ऑफर करत होते. प्रीस्टली स्वत:ला शो ऑफ पीस सांगत म्हणाली की, जास्त वयाच्या श्रीमंत व्यक्तींसोबत डीनरला जाणं, लक्झरी वेकेशनवर एन्जॉय करणं आणि फिरणं, चांगलं बोलणं तिला आवडतं.

फिरण्यासाठी आणि डीनरसाठी घेते पैसे

डॅश प्रीस्टली म्हणाली की, यादरम्यान तिचं कोणत्याही व्यक्तीसोबत रोमॅंटिक रिलेशनशिप राहत नाही. ती फक्त त्यांना कंपनी देते. प्रीस्टली एका डीनरसाठी साधारण ३५ हजार रूपये चार्ज करते. असं करत प्रीस्टलीने तिचे स्वत:चे ५ बिझनेस उभे केले आहेत. आणि आता तर शुगर डॅडीसोबत जाण्याचं कामही तिने बंद केलं आहे.

दर महिन्यात मोठी कमाई

प्रीस्टलीने सांगितलं की, तिला अनेक वर्ष तिची कशाचीच बिलं भरावी लागली नाही. तिला नेहमीच महागडे गिफ्ट मिळतात. चांगलं जेवण आणि शॉपिंग तर कॉमन आहे. तिच्याकडे ब्रॅंडेड शूज, बॅग्स आहेत. अनेकदा तर न मागताही मोठी रक्कम मिळते. या सर्वातून प्रीस्टली दर महिन्याला लाखो रूपये कमवत होती आणि अशाप्रकारे तिने कोट्यावधीची संपत्ती जमवली आहे.

आता दुसऱ्या तरूणींना देते ट्रेनिंग

आता आपलं जुनं काम सोडून प्रीस्टली दुसऱ्या तरूणींना श्रीमंत जास्त वयाच्या व्यक्तीसोबत फिरून पैसे कमावण्याच्या टिप्स देते. प्रीस्टली या कामाला भावनात्मक खेळ मानते. 

दरम्यान शुगर डॅडी म्हणजे असे श्रीमंत जास्त वयाचे व्यक्ती जे त्यांच्यासोबत डेट करणाऱ्या महिलांना महागडे गिफ्ट आणि भरपूर पैसे देऊन खूश ठेवतात. या बदल्यात ते त्यांचा एकटेपणा दूर करता. प्रीस्टली सांगते की, अनेकदा तर केवळ चॅटवर लोक तिच्यासोबत बोलतात, त्यांची भेटही होत नाही. 

Web Title: Woman living rich lifestyle in free sugar daddy porsche car diamond jewelry, now giving tips to other girls