हे तर भलतंच! ही बया म्हणते हीनं मायकल जॅक्सनच्या भूताशी लग्न केलंय, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 16:10 IST2021-08-18T16:06:33+5:302021-08-18T16:10:10+5:30
अमेरिकेतील कॅथलीन रॉबर्ट्स या महिलेनं एक विचित्र दावा केलाय. तिनं म्हटलंय की तिने मायकल जॅक्सनच्या भूताशी लग्न केलंय.

हे तर भलतंच! ही बया म्हणते हीनं मायकल जॅक्सनच्या भूताशी लग्न केलंय, जाणून घ्या सत्य
तुमचा भुताप्रेतांवर विश्वास असेल अथवा नसेल पण या जगात अशी काही लोकं आहेत जी स्वत: भूतांशी संबध प्रस्थापित केल्याचा दावा करतात. या जगात कोण काय दावा करेल याचा भरोसा नसतोच त्यामुळे अशा दाव्यांवर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे. अमेरिकेतील कॅथलीन रॉबर्ट्स या महिलेनं असाच एक विचित्र दावा केलाय. तिनं म्हटलंय की तिने मायकल जॅक्सनच्या भूताशी लग्न केलंय.
कॅथलीन रॉबर्ट्स ही महिला टिकटॉकवर वेगवेगळे व्हिडिओ बनवते. त्यातून तीही चित्रविचित्र दावे करत असते. काहीच दिवसांपूर्वी तिनं प्रसिद्ध अभिनेत्री मर्लिन मुनरो चा अवतार असल्याचा दावा केला होता. आता तिनं मायकल जॅक्सनच्या भूताशी लग्न केल्याचा दावा केला आहे.
कॅथलीन असं म्हणते की मायकल जॅक्सनच भूत तिच्या अंगातही येतं. जेव्हा तिला बाथरुममध्ये जायचं असतं तेव्हा मायकल जॅक्सनचं भूत तिच्या अंगात येऊन नाचू लागतं. गाणी गाऊ लागतं. तसंच हे भूत तिच्या शरीरात येऊन आवडीच्या पदार्थांवरही ताव मारतं. कॅथलीननं त्यांच्यातील सेक्शुअल रिलेशनशिपबद्दल असा खुलासा केला की, तिनं अजूनही त्या भूताला हात लावला नाही किंवा किसही केलेलं नाही.