जीव देण्यासाठी डोंगराहून उडी घेतलेली महिला झाडावर अडकली, एका तासानंतर तिला असं काढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 14:04 IST2021-06-24T14:03:36+5:302021-06-24T14:04:59+5:30
असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, महूच्या साईधाम कॉलनीमध्ये राहणाऱ्या महिलेने कौटुंबिक कलहामुळे इतकं गंभीर पाउल उचललं असेल.

जीव देण्यासाठी डोंगराहून उडी घेतलेली महिला झाडावर अडकली, एका तासानंतर तिला असं काढलं
इंदुरपासून ३५ किलोमीटर दूर पिकनिक स्पॉट पातालपानीमध्ये एका बॅंकेत कर्मचारी असलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्या करण्यासाठी महिलेने डोंगराहून उडी घेतली, मात्र सुदैवाने ती जमिनीवर पडण्याआधीच एका झाडात अडकली. महिलेला उडी मारताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं होतं, ज्यानंतर लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.
घटनास्थळावर पोहोचल्यावर पोलिसांनी ग्रामीण लोकांच्या मदतीने १ तासांनंतर महिलेचा जीव वाचवला. लोकांनी महिलेला सुखरूप खाली आणले. महिलेच्या डोक्याला आणि कंबरेला जखमा झाल्या आहेत. या जखमा सामान्य स्वरूपाच्या असल्याचं सांगितलं जात आहे. सद्या महिलेला महूच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
पोलिसांनी सांगितलं की, महिला इथे आत्महत्या करण्याच्या उद्देशानेच आली होती. यानंतर तिने डोंगराहून खाली उडी घेतली. मात्र, सुदैवाने महिला खाली एका झाडा अडकली. ज्यामुळे तिला जीव वाचला.
असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, महूच्या साईधाम कॉलनीमध्ये राहणाऱ्या महिलेने कौटुंबिक कलहामुळे इतकं गंभीर पाउल उचललं असेल. पोलीस अधिकारी अजीत सिंह बैस यांच्यानुसार महिलेचा पती मुंबईत SBI बॅंकेत इंजिनिअर आहे. महिलाही मुंबईत SBI बॅकेत क्लार्क आहे. लॉकडाऊन लागल्यापासून महिला महूमध्येच राहत होती. महिलेचा जबाब अजून नोंदवण्यात आलेला नाही. त्यानंतरच खरं कारण स्पष्ट होईल.