शिपिंग कंटेनरमधून येत होता आवाज, पोलिसांनी जाऊन पाहिलं तर बसला धक्का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 13:41 IST2024-03-12T13:40:59+5:302024-03-12T13:41:33+5:30
कुणालाही माहीत नव्हतं की, त्यात काय होतं. पण जेव्हा ते उघडण्यात आलं तेव्हा कुणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

शिपिंग कंटेनरमधून येत होता आवाज, पोलिसांनी जाऊन पाहिलं तर बसला धक्का...
अनेकदा छोट्या छोट्या चुकांमुळे कुणाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. त्यानंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशीच एक घटना समोर आली आहे. एका कंटेनरमध्ये असंच काहीसं दिसलं होतं, जे बघून अधिकारी हैराण झाले. कंटेनरमधून अजब आवाज येत होता. कुणालाही माहीत नव्हतं की, त्यात काय होतं. पण जेव्हा ते उघडण्यात आलं तेव्हा कुणालाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. यात एक महिला होती. ती त्याच अडकली होती. महिला साधारण एक आठवड्यापासून बेपत्ता होती.
फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार, ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडामधील आहे. महिला गुरूवारी कंटेनरमध्ये सापडली. पोलिसांनी घटनेची माहिती देत सांगितलं की, 52 वर्षीय मार्लेनी लोपेज शेवटची सोमवारी दिसली होती. ती तिच्या मुलाला घेण्यासाठी घरातून निघाली होती. पण घरी परत आलीच नाही. तिच्यासोबत काम करणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना याची माहिती दिली होती. अधिकाऱ्यांनी तिच्या परिवाराची चौकशी केली. आजूबाजूचं लोकेशन चेक केलं आणि ती बेपत्ता झाल्याचे पोस्टर लावले.
यादरम्यान त्यांना माहिती मिळाली की, एक महिला शिपिंग कंटेनरमध्ये कैद आढळली आहे. लोपेज कंटेनरचा दरवाजा वाजवत होती. कुणीतरी तिचा आवाज ऐकला आणि तिथे जाऊन पाहिलं. लोपेजने सांगितलं की, तिला माहीत नाही की, ती कंटेनरमध्ये कशी आली. तिच्यासोबत हे कसं झालं याची चौकशी केली जात आहे. याआधीही अमेरिकेतून अशीच एक घटना समोर आली होती. ज्यात कंटेनरमध्ये एक कुत्रा सापडला होता. तो एक आठवड्यापासून उपाशी होता.