घराची सफाई करताना महिलेला सॉक्समध्ये सापडली अशी वस्तू, रातोरात बनली लखपती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 14:05 IST2023-09-13T14:03:52+5:302023-09-13T14:05:18+5:30
जी वस्तू या महिलेला मिळाली त्यामुळे ती मालामाल झाली. या सॉक्समध्ये एक हिऱ्याची अंगठी होती. जोआना नावाच्या महिलेला ही अंगठी सापडली.

घराची सफाई करताना महिलेला सॉक्समध्ये सापडली अशी वस्तू, रातोरात बनली लखपती
असं म्हणतात की, एखाद्याचं नशीब कधी कसं चमकेल हे सांगता येत नाही. एखादा कोट्याधीश रस्त्यावर येऊ शकतो तर एखादा भिकारी कोट्याधीश बनू शकतो. एका महिलेसोबत असंच काहीसं झालं. तिला एका जुन्या सॉक्समध्ये असं काही सापडलं ज्याचा तिने कधी आयुष्यातही विचार केला नसेल. जी वस्तू या महिलेला मिळाली त्यामुळे ती मालामाल झाली. या सॉक्समध्ये एक हिऱ्याची अंगठी होती. जोआना नावाच्या महिलेला ही अंगठी सापडली.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जेव्हा जोआना बीबीसीच्या अॅंटीक्स रोडशोमध्ये ही अंगठी घेऊन आली तेव्हा अॅंटीक्स एक्सपर्ट हार्डीने महिलेला सांगितलं की, तिची अंगठी फारच महागडी आहे. जे ऐकून जोआना हैराण झाली. जोआना म्हणाली की, बरं झालं की, तिने सॉक्स वॉशिंग मशीनमध्ये टाकला नाही.
अॅंटीक एक्सपर्टने जेव्हा महिलेला विचारलं की, तुम्हाला ही अंगठी कशी मिळाली? तर महिलेने सांगितलं की, 'ही अंगठी माझ्या आईची होती. आम्हाला विश्वास आहे की, ही तिला तिच्या पंजोबाने दिली असेल. घरात साफसफाई करताना कपाटातील एका सॉक्सवर नजर गेली. त्यात ही अंगठी सापडली.
ही अंगठी जोआनाने पाहिली. ती 1915 मध्ये प्लॅटिनमपासून तयार करण्यात आली होती. जोआना म्हणाली की, अंगठी फार सुंदर आहे. तसेच अंगठी 4 कॅरेटच्या हिऱ्यात फार सुंदर दिसते.
जोआनाला समजलं की, अंगठी बरोबर केल्यावर या अंगठीला लिलावात 20 लाख रूपये किंमत मिळू शकते. आता जोआना लवकरच या अंगठीचा लिलाव करणार आहे.