1 कोटींची कमाई, खाणं-पिणं- राहणं फ्री; 6 महिने काम अन् 6 महिने आराम, तरुणी म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:11 IST2023-07-21T13:09:02+5:302023-07-21T14:11:38+5:30
तरुणी एका वर्षात 6 महिने काम करते आणि उरलेले 6 महिने आराम करते. विशेष म्हणजे तिचा सीटीसी जवळपास एक कोटीपर्यंत पोहोचतो.

फोटो - news18 hindi
आयुष्यात नोकरी करताना समाधानी असणं खूप गरजेचं आहे. मात्र, प्रत्येकाला त्यांच्या आवडीची नोकरी मिळत नाही ही वेगळी बाब आहे. एखाद्याला चांगली नोकरी मिळाली तर त्याला चांगला पगार मिळत नाही. पण जगात असे काही लोक आहेत जे आपली नोकरी आणि पगार या दोन्ही गोष्टींवर खूप खूश आहेत. अशाच एका तरुणीची गोष्ट आता समोर आली आहे. ही तरूणी ऑस्ट्रेलियाची रहिवासी आहे.
तरुणी एका वर्षात 6 महिने काम करते आणि उरलेले 6 महिने आराम करते. विशेष म्हणजे तिचा सीटीसी जवळपास एक कोटीपर्यंत पोहोचतो. जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये असा व्यवसाय आणि नोकरी दूरची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियातील ग्लॅमरस ट्रक ड्रायव्हर एशली दरवर्षी सुमारे एक कोटी रुपये कमवत आहे. तिचं राहणं, खाणं आणि फिरणं सर्व विनामूल्य आहेत आणि ती वर्षातील सहा महिने विश्रांती देखील घेते.
एशलीने तिची कहाणी जगासमोर शेअर केली आहे. अशा परिस्थितीत तिच्या नोकरीबद्दल जाणून घेऊन लोक थक्क होतात. ती मायनिंग इंडस्ट्रीशी निगडीत आहे. तिला पगाराव्यतिरिक्त, दरमहा बंपर बोनस देखील मिळतो. रिपोर्ट्सनुसार, ब्युटीफुल एशली टिकटॉकवर देखील सक्रिय आहे. तिचे हजारो फॉलोअर्स आहेत.
अनेकवेळा ती रस्त्यावरच्या जीवनाबद्दल मोकळेपणाने बोलते. ती म्हणते की ती एक 'खरी मुलगी' आहे जी कोणत्याही प्रकारे शो ऑफ करत नाही. मात्र, तरीही काही लोक ट्रोल करतात. ट्रक ड्रायव्हरचा व्यवसाय तिच्यासाठी योग्य नाही, अशा गोष्टींचा त्रास होण्याऐवजी ती त्याकडे दुर्लक्ष करते, असे तिचे म्हणणे आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.